वढोलीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

0
920

वढोलीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

गोंडपिपरी(सुरज माडुरवार)

शिवछत्रपती जयंतीच्या निमित्याने संपूर्ण गावात स्वछता अभियान राबवून दिवसाची सुरुवात करण्यात आली.हनुमान मंदिर चौक,छत्रपती शिवाजी चौक येथे शीवाजींच्या प्रतिमेस पुष्ममाला अर्पण करून उपस्थित शिवभक्तांना मास्क वाटप करून महाप्रसाद वितरण करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ढाल तलवारीचे तसेच उत्तुंग व्यक्तिमत्वाचे व बहुजन प्रतिपालक असा वर्तमान व भविष्यासाठी मार्गदर्शक ठरावा त्याचे स्मरण सर्वांना व्हावे,शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजापुढे आणणे महत्वाचे ठरते म्हणून उत्साहात शिवजयंती साजरी केली असल्याचे आयोजक मंडळाने सांगितले. यावेळी शेकडो शिवभक्तांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here