सर्व खाजगी दवाखाने सरकारने ताब्यात घ्यावी! : जयदीप खोब्रागडे

0
784

सर्व खाजगी दवाखाने सरकारने ताब्यात घ्यावी! : जयदीप खोब्रागडे

सम्पूर्ण चंद्रपुर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. त्यात शासकीय दवाखान्यात उपचार न झाल्यामुळे पैशाच्या अभावी खाजगी रुग्णालयात न जाऊ शकणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र देऊन सर्व खाजगी रुग्णालय सरकारने ताब्यात घेऊन शासकीय रुग्नालयाच्या धर्तीवर उपचार करावा अशी मागणी केली आहे. त्या सोबतच चंद्रपुर जिल्ह्यातील जे रुग्ण बेड न मिळाल्यामुळे बाजूच्या राज्यात जात आहेत त्यांना तिथे रेमडेसीवीर इंजेक्शन मिळत नाही आहे. त्यांना त्या इंजेक्शन चा पुरवठा करावा अशी मागणी सुद्धा याद्वारे करण्यात आलेली आहे. सोबतच चंद्रपुर जिल्ह्यात असलेल्या वेंटीलेटर, ऑक्सिजन एम्बुलेंस सरकारने ताब्यात घेऊन माफक दरात त्या रुग्णांना उपलब्ध करुन द्याव्यात अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. यावेळी शहर उपाध्यक्ष सुभाष थोरात, लताताई साव, सुलभाताई चांदेकर, प्रज्ञा रामटेके, कृष्णाक पेरकावार, विशेष निमगडे, रमाबाई मेश्राम, अक्षय लोहकरे, सुनील भसारकर, प्रतिभा रामटेके, मंदाताई पाटिल, पल्लवी खोब्रागडे, दर्शना तिवारी, यशवंत गायकवाड, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here