काेराेना काळात उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालय इमारतीतील उपचार व्यवस्थेत तात्पुरता बदल करावा गणेश वाघमारेंची मागणी

0
432

काेराेना काळात उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालय इमारतीतील उपचार व्यवस्थेत तात्पुरता बदल करावा गणेश वाघमारेंची मागणीउस्मानाबाद🟢किरण घाटे🔴कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतच असुन जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आपापल्या परीने या वरती नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसांगणिक वाढत असुन सर्व सामान्य, कोरोना संसर्ग व इतर रुग्ण जुन्या ओपिडी ईमारतीत तपासणी पेपर काढण्यापासून तर प्राथमिकता तपासणी ओपिडी ईमारतीत होते. नवीन ईमारतीत कोरोना संसर्ग रुग्णाचे उपचार चालू असुन ही ईमारत मेन गेट व रस्त्याच्या बाजूला आहे. सर्व प्राथमिक उपचार हे मधोमध असलेल्या ओपिडी ईमारतीत होतात. यामुळे रुग्ण व त्यांच्या सोबत आलेल्या नातलगांची गर्दी होत असुन यातुन कोरोना संसर्गाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता सर्वसामान्य रुग्णांची तपासणी नर्सिंग प्रशिक्षण, वसतिगृह व इतर ईमारतीत कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे तात्पुरती वेगळी व्यवस्था केली तर आलेल्या सर्व सामान्य रुग्ण व त्यांचे नातलग कोरोना संसर्ग रुग्णापासुन दुर होतील अशी मागणी एका निवेदनातुन ई-मेल द्वारा उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डि.के. पाटील व सदस्य, रुग्ण कल्याण समिती यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ता गणेश रानबा वाघमारे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here