रात्रीच्या काळोखात सर्व घर जळून खाक, गडचांदुर येथील घटना!

0
950

रात्रीच्या काळोखात सर्व घर जळून खाक, गडचांदुर येथील घटना!

गडचांदूर, प्रवीण मेश्राम : देवराव कल्लुरवार यांच्या घराला दि.१८/४/२०२१ रोजी अंदाजे रात्री दिड वाजता आग लागली होती. या आगीत समस्त घर, पैसा आडका आणि सोने पुर्णतः जळून खाक झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा गडचांदूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कल्लुरवार यांच्या कुटुंबाला आर्थिक आणि संसार उपयोगी वस्तू व किराणा सिदा वाटप करण्यात आले. या भीषण आगीमध्ये संपूर्ण साहित्य जळाले आहे. कुटुंब रस्त्यावर आलेले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर खूप वाईट वेळ आलेले आहे. रात्री दीडच्या सुमारास त्यांच्या घराला भीषण आग लागली. काम करत असलेल्या मजुरांचे पैसे आडके सर्व जळून खाक झालेले आहेत. रात्रभर प्रभागातील सर्व नागरिकांनी त्यांच्या घरातील वीज विझवुन टाकले. अग्निशामक दलाची गाडी वेळेवर येऊ शकली नाही. ही आग इतकी भीषण होती की त्यामध्ये शेजारच्या घरांना सुद्धा आग लागली. त्यामध्ये धनंजय चांदेकर यांचे घराला सुद्धा आग लागली. यात त्यांचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलीस विभाग व तलाठी यात पंचनामा करून गेले. या आगीमध्ये सर्व संसार उध्वस्त झालेल्या त्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे अशी आर्त हाक जनतेकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here