कोरोनाचा उपाययोजनांबाबत कृती आराखडा तयार करा

0
445

कोरोनाचा उपाययोजनांबाबत कृती आराखडा तयार करा

रेमडिसिव्हिर इंजेक्शन व इतर औषधींचा काळाबाजार होता कामा नये

अमृत मेडिकलच्या माध्यमातून गोरगरिबांना औषध उपलब्ध करून द्या

खासदार बाळू धानोरकर यांच्या जिल्हाधिकारी गुल्हाने यांना सूचना

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना बाधितांची व बाधित मृत्यूची संख्या वाढतच आहे. मूल, बल्लारपूर सह अन्य केंद्रावर कोविड लस उपलब्ध नसल्याने लशीकरन बंदचे फलक लावण्यात आले. रेमडिसिव्हिर इंजेक्शन चा काळाबाजार ऑक्सीजनचा तुटवडा व एच. आर. सी. टी स्कॅन टेस्ट चे दर यावर नियंत्रणासाठी तात्काळ विशेष पथक नेमावे तसेच वाढते कोरोना रुग्णांची संख्या बघता बेडची संख्या वाढविण्यासाठी व डॉक्टर, नर्स उपलब्ध करण्याचे तात्काळ नियोजन करावे. तसेच गोरगरीब जनतेसाठी अमृत मेडिकलची स्थापना झालेली आहे. केंद्रपुरस्कृत या मेडिकलमध्ये माफक दरात औषध साठा उपलब्ध करून देण्याच्या लोकहितकारी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदनाच्या माध्यमातून केल्या.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्या सोबतच मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होत आहे. योग्य उपचार व नियोजन करणे गरजेचे आहे. परंतु उपलब्ध परिस्थिती रुग्णांवर योग्य उपचार व बेड उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्याकरिता योग्य नियोजनाची आवश्यकता असल्याचे सूचना खासदार बाळू धानोरकरांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

मागील कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात एच. आर. सी. टी. स्कॅन टेस्ट चे वाढीव दर असून गोरगरिब जनतेची लूट होत असल्याचे दिसून आले होते. परंतु आता मात्र हे थांबविण्यासाठी दर फलक लावण्यास बाध्य करावे. तसेच शासकीय वैदयकीय महाविद्यालयात खाटांची संख्या वाढवावी यासह अन्य लोकहितकारी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here