आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या वतीने सौ दुर्गा देशमुख यांच्यावर यशस्वी उपचार…! रुग्णाच्या कुटुंबीयांनी जितेंद्र पाटील यांचे मानले आभार…!!!

0
552
  •           प्रमोद चौधरी

             जळगाव जिल्हा प्रतिनिधी
              ९९६०५९५८०७.

    रुग्णाच्या कुटुंबीयांनी जितेंद्र पाटील यांचे मानले आभार.

    नाव : दुर्गा सुभाष देशमुख.वय :50
     गावं : रा ढोकसाळ तालुका मंठा जिल्हा जालना
     दुर्गा देशमुख यांच्या छाती मध्ये गाठ आहे असे त्यांना समजून आले. त्यांनी जालना मध्ये स्थानिक हॉस्पिटल ला जाऊन. गाठ कसली आहे याची तपासणी केली. आणि सर्व रिपोर्ट ( बायोप्सी) करून घेतले. डॉक्टरांनी त्यांना  कॅन्सर ची गाठ आहे असे त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले.(ब्रेस ) केंसर च ऑपरेशन साठी डॉक्टर यांनी 2 लाखाचं कोटेशन लिहून दिले.

    पण दुर्गा देशमुख यांची गरिबीची परिस्थिती असल्याकारणाने त्यांनी स्थानिक सरकारी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.पण त्यांच्या गावामध्ये ऑपरेशन साठी काही सुविधा नसल्या कारणाने. त्यांना जालना किंवा औरंगाबाद जाण्यासाठी सल्ला डॉक्टरांनी दिला. दोन-तीन महिने पासून जालना – औरंगाबाद फिरून सुद्धा त्यांचे उपचार होत नव्हता. त्यांचीही परिस्थिती बघून त्यांच्या नातेवाईकांनी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन चे श्री जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क करून दिला. जितेंद्र पाटील यांनी त्यांचे सर्वे रिपोर्ट व्हाट्सअप द्वारे मागून घेतले. आणि त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईला या असे सांगितले. दुर्गा देशमुख हे मुंबईला आल्यावर त्यांना तेरणा हॉस्पिटल नवी मुंबई. या ठिकाणी ॲडमिट करण्यात आले.डॉ अमित पाटील सर (कॅन्सर स्पेशल) यांचा हातून त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना 20 ते 25 दिवस हॉस्पिटल मध्ये ॲडमिट होते. त्यांना कुठलाही खर्च न लागता सर्व मोफत मध्ये करण्यात आले. दुर्गा देशमुख यांची  कालच  सुट्टी झाली. त्यांच्या नातेवाईकांनी श्री जितेंद्र पाटील यांना कॉल करून सांगितले आम्ही तुमचे खूप आभारी आहेत.तुमचा मुळे माझी ताई च ऑपरेशन मोफत मध्ये झाले. आणि ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं. आज आम्ही आमचा गावी सुखरूप जात आहोत. दुर्गा देशमुख आज त्यांच्या घरी कुटुंबीयांसोबत ठणठणीत आणि सुखरूप आहेत.

    सौ दूर्गा देशमुख यांच्या सर्व नातेवाईकांनी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन चे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचे खूप खूप आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here