यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

0
268

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५१ वी तर लाल बहादूर शास्त्री यांची ११७ वी जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात आली. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातही या महापूरुषांच्या जयंती निमित्य छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या दुर्गा वैरागडे, वैशाली मद्दीवार, संगीता विश्वोजवार, वैशाली रामटेके, स्मिता वैद्य, अनिता भिमुलवार आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here