अब्दुल मुस्ताक यांचा सेवानिवृत्त निरोप समारंभ संपन्न

0
581

अब्दुल मुस्ताक यांचा सेवानिवृत्त निरोप समारंभ संपन्न
🟨🟥चंद्रपूर -किरण घाटे🟨🟪
जेष्ठ हॉलीबॉल बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारे माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक समद पटेल यांचा सेवानिवृत्त निरोप समारंभ जिल्हा क्रीडा संकुल येथील हॉलीबॉल क्रीडागणात मोठ्या उत्सहात संपन्न झाला. याप्रसंगी त्यांना संस्थेच्या वतीने पुष्पगुछ, शाल, श्रफळं व मानचिन्ह देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रदीप जानवे, उपाध्यक्ष श्यामकांत थेरे व कोषध्यक्ष रामास्वामी कापरबोयाना यांची मंचवर उपस्थिती होती व यांनी अब्दुल मुस्ताक बद्दल गौरवउद्गार काढले तसेच हेमंत घिवे , राजीव चौधरी व प्रा. संदिप ढोबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अब्दुल मुस्ताक समद पटेल यांनी निरोप समारंभाला उत्तर देतांना जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर आणि जेष्ठ हॉलिबॉल बहुद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्यासोबत भविष्यातही जोडून राहील व खेळाडूंना मार्गदर्शन करीत राहील असे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणात प्रदीप जानवे यांनी अब्दुल मुस्ताक सारख्या सरकारी अधिकाऱ्याची गरज असल्याचे सांगितले.
या निरोप समारांभाचे संचालन संस्थेचे सचिव दीपक जेऊरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेंद्र कुंभारे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अमित दिकोण्डवार, अरविंद पुराणकर, सुनील कायरकर, चेतन गजलवार व प्रवीण चवरे यानी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here