गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपीस १० वर्ष कारावासाची शिक्षा आणि दंड

0
475

गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपीस १० वर्ष कारावासाची शिक्षा आणि दंड

प्रतिनिधी । पोलीस स्टेशन राजुरा हद्दीतील लक्कडकोट जवळ गांजाची वाहतूक करणाऱ्या आरोपीस आज चंद्रपूर न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.
१८ जुलै २०१८ रोजी आरोपींनी संगनमत करून आपल्या ताब्यातील टाटा इंडिगो (एम पी २० सी एफ ०२२५) कार मध्ये गांजा या मादक पदार्थाची वाहतूक करीत असताना लक्कडकोट जवळ गाडीची झडती घेतली असताना गांजा आढळून आला. त्यानुसार राजुरा पोलीस स्टेशन येथे अप. क्र. ५४२/२०१८ कलम २०, २२, २५ एनडीपीएस ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा तपासात घेतल्यानंतर तत्कालीन राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जंजाळ यांनी आरोपीस निष्पन्न करून आरोपी विरुद्ध सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयाने सुनावणी दरम्यान आज आरोपी शिवा महादेव खारा (२५) व ओमीनी मुका कोबाली (रा. मलका नगरी राज्य ओडिसा) यांस कलम २० (b), (¡¡), (c), २५ एनडीपीएस ऍक्ट मध्ये १० वर्ष शिक्षा व प्रत्येकी एक लाख रुपये दंड, दंड न भरल्यास दोन्ही आरोपींना १ वर्ष शिक्षा अशी शिक्षा ठोठावली आहे.
सदर प्रकरणात सरकार तर्फे ऍड. श्री. असिफ शेख, सरकारी अभियोक्ता, चंद्रपूर आणि कोर्ट पैरवी म्हणून पोहवा सुखदेव मेश्राम पोलीस स्टेशन राजुरा यांनी काम पाहिले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here