निसर्गाची सर्वात मोठी व्यवस्था वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींची गरज – आ. किशोर जोरगेवार

0
369

निसर्गाची सर्वात मोठी व्यवस्था वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींची गरज – आ. किशोर जोरगेवार

पर्यावरण संवर्धन व विकास समिती आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ च्या वतीने पर्यावरण प्रेमी व कोरोना योध्दांचा सत्कार

मानवनिर्मीत तांत्रीक आपत्तीमूळे पर्यावरणाचा समातोल बिघडत चालला आहे. जिवन प्रणाली सुखद करण्याच्या नादात पसरत चालले तांत्रिकी जोळे पृथीवरील जिवसृष्टीसाठी घातक आहे. त्यामूळे आता याकडे गांभिर्यपूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. वृक्ष लागवड करुन चालणार नाही तर त्यांचे संगोपणही केल्या गेले पाहिजे. पर्यावर प्रेमींकडून सातत्याने पर्यावरण वाचविण्याच्या दिशेने पर्यत्न केल्या जात आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून प्रकृतीची सर्वात मोठी व्यवस्था म्हणजेच पर्यावरण वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींची खरी गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आज रविवारी पर्यावरण संवर्धन व विकास समिती आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ द्वारा पर्यावरण प्रमीं व कोरोना योध्दांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आ. जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगर सेवक राजेंद्र वैद्य, डी. के.आरिकर, हिराचंद बोरकूटे, डॉ. भगत, राजेश सोलापन, शुभांगी डोंगरवार, डॉ. प्रसाद पोटदुखे, सुनील दहेगावकर, डॉ. देव कन्नाके, जगदीश लोणकर, प्रियदर्शन इंगळे, प्रा. अनिता वाळके यांची उपस्थिती होती आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, आज पर्यावरचा अनेक ठिकाणी उद्रेक होत आहे. हे टाळण्यासाठी आपल्याला निसर्गाचं व्यापक अस्तित्व मान्य करायला हवं, चंद्रपूरचा विचार केला असता हा वनसंपत्तीने वेढलेला जिल्हा आहे. असे असले तरी प्रदुषणाच्या बाबतीत या जिल्ह्याने राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मागे सोडले आहे. त्यामूळे चिंतेसह आता चिंतन करण्याचीही गरज आहे. पर्यावरण प्रेमी पर्यावरण वाचविण्यासाठी झटत आहे. मात्र दुर्दैवाने त्यांची दखल घेतल्या जात नाही हे ही सत्य नाकारता येणार नाही. ही परिस्थिती बदलल्या गेली पाहिजे, चंद्रपूरातील पर्यावरण प्रेमींना शक्य ती सर्व मदत करण्याची आपली तयारी असल्याचेही यावेळी आ. जोरगेवार यांनी बोलून दाखविले.
या कार्यक्रमात डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. आशिष जुलमे, डॉ. विद्याधर बन्सोड, रेखा खोब्रागडे, शिल्पा कोंडावार, निलम सुरमवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here