काेमलवार कुटुंबातील मायेची सावली हरपली!

0
619

काेमलवार कुटुंबातील मायेची सावली हरपली!

चिराेलीच्या पार्वताबाई काेमलवार यांचे दुख:द निधन!

किरण घाटे

मूल । केंद्रीय मंडळ अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष, मूल तहसिल कार्यालयाचे सेवानिवृत्त नायब तहसिलदार तथा पटवारी संघटनेचे झुंजार नेते पुरुषोत्तम काेमलवार यांच्या माताेश्री पार्वताबाई विठ्ठलराव काेमलवार यांचे आज रविवार दि.१८आँक्टाेबरला सकाळी ८वाजता (मूल समिपच्या) चिराेली निवास स्थानी दुख:द निधन झाले. म्रूत्यू समयी त्यांचे वय ९५ वर्षाचे हाेते. विदर्भ मंडळ अधिकारी संघटना चंद्रपूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रदीप जुमडे , अनिरुध्द पिंपळापुरे , गजानन देऊळकर, रमेश आवारी , संपत कन्नाके , महादेव कन्नाके , विदर्भ पटवारी संघटना चंद्रपूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रकाश सुर्वे , चंद्रपूर जिल्हा सहाय्यक पुरवठा अधिकारी संजय राईंचवार , सेवानिवृत्त नायब तहसीलदार लिमचंद पेंढारकर से.नि. तहसिलदार गुलाबराव खाडीलकर ,पटवारी संघटनेचे सदस्य किरण माेडकवार व तलाठी विनाेद चिकटे यांनी दुखवटा व्यक्त करुन दिवंगत पार्वताबाई काेमलवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here