गोंडपीपरी येथील युवकांच्या भाजपा विद्यार्थी आघाडीला पाठिंबा
भाजयुमो जिल्हा सचिव राकेश पुन आणि विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा विद्यार्थी आघाडीमध्ये जाहीर प्रवेश

आज दि. 6 नोव्हेंबरला राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपीपरी येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी गोंडपीपरी तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.
माजी केंद्रीय मंत्री मा. हंसराजजी अहीर, माजी वनमंत्री तथा अर्थ नियोजन मंत्री विद्यमान आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. देवरावदादा भोंगळे, राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा. ऍड. संजयभाऊ धोटे, नवनियुक्त भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा. आशिषभाऊ देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव तथा नगरसेवक गोंडपीपरी येथील राकेशभाऊ पुन, भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहनभाऊ कलेगुरवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच सुनीलभाऊ फुकट भाजपा ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष, भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे राजुरा तालुका अध्यक्ष राहुल थोरात, विद्यार्थी आघाडीचे राजुरा तालुका महामंत्री छबिलाल नाईक, राजुरा शहर अध्यक्ष सुधीर अरकीलवार, शहर महामंत्री अजयकुमार श्रीकोंडा, युवा नेते हरीश ब्राह्मणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गोंडपीपरी येथील सक्रिय कार्यकर्ते प्रज्वल बोबाटे यांच्या सहकार्याने ही बैठक संपन्न झाली. येणाऱ्या काळात पक्षाला एक नवसंजीवनी देण्याचे काम विद्यार्थी आघाडीतील प्रत्येक नवयुवक विद्यार्थ्यांना करायचे आहे असे आव्हान भाजयुमो विध्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहनभाऊ कलेगुरवार यांनी विद्यार्थ्यांना केले. त्याप्रसंगी गोंडपीपरी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.