घुग्घुस येथील शिवमंदिरात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते दुग्धाभिषेक व पुजाअर्चना

0
419

घुग्घुस येथील शिवमंदिरात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते दुग्धाभिषेक व पुजाअर्चना

 

 

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते भगवान महाकाल नगरी उज्जैन येथील नवनिर्मित भव्य “महाकाल लोक” कॉरिडॉरचे आज लोकार्पण पार पडले. आता हे भव्य दिव्य कॉरिडॉर राष्ट्राला समर्पित झाले आहे.

या ऐतिहासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने स्थानिक इंदिरानगर वसाहतीतील शिव मंदिरात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते शिवपिंडाची पुजाअर्चना करून दुग्धाभिषेक करण्यात आले.

यावेळी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, संतोष नुने, सिनू इसारप, बबलु सातपुते, परमानंद चौबे, शैलकुमार चौधरी, राम यादव, दिनेश यादव, गुड्डू यादव, भीमदेव कार्लेकर, बलदेव कार्लेकर, किरण शर्मा, मीना सिंग, हरशू रानडे, सीता दूधराज, शिमो रावत, धनाजी पांडे, रामप्रवेश यादव, हरेंद्र तिवारी, मानू शर्मा, हेमंत कुमार, असगर खान, कृष्णा कपारे, किशोर घनकसार, आनंद चौधरी, हरेराम यादव, नंदजी यादव, विष्णू यादव, लखन यादव, दीपक जयस्वाल, रवी गिरी, जितेंद्र यादव, संतोष मिश्रा, सुनील यादव व कालूप्रसाद यादव आवर्जून उपस्थित होते.

देव-देश-संस्कृतिच्या रक्षणासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी हे सातत्याने प्रयत्नशील असतात. उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ कॉरिडॉरनंतर उज्जैन स्थित भगवान महाकालेश्वर मंदीरात उभारण्यात आलेले हे अतिशय देखणे आणि भव्य-दिव्य महाकाल कॉरिडॉर आज भक्तांसाठी लोकार्पित झाले. या भव्यदिव्य कॉरीडोरच्या निर्माणामुळे भगवान महाकालेश्वराच्या दर्शनार्थ येणाऱ्या भाविकभक्तांना याठिकाणी विविध नावीन्यपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here