चंद्रपूरात मुस्लिम कार्यकर्ता आणि मुस्लिम समाजाच्या वतीने कृषि विधेयकांच्या विरोधात किसान बाग आंदोलन

0
622

चंद्रपूरात मुस्लिम कार्यकर्ता आणि मुस्लिम समाजाच्या वतीने कृषि विधेयकांच्या विरोधात किसान बाग आंदोलन

वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार, अनेकांची उपस्थिती

चंद्रपूर / किरण घाटे । दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहीन बागच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातुन आज बुधवार दि. २७ जानेवारी रोजी सर्व जिल्ह्यात “किसान बाग” आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. अत्याचारग्रस्तांनी एकत्र येऊच नये असे आरएसएसचे षडयंत्र आहे. म्हणुन मुस्लिम व इतर घटकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम ते करतात. हे अत्याचार पिडित घटकांना विभागून त्यांच्यावर अत्याचार करू इच्छित आहे म्हणून किसान बागच्या माध्यमातुन या आंदोलनात मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभागी झाले. मुस्लिम समाजाच्या ‘किसानबाग’ आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीवादी राजकारणाला शह मिळाल्याचे आंदोलनात स्पष्ट झाले. वादग्रस्त नवीन कृषी कायद्यांविरूद्ध दिल्लीच्या सिमेंवर शेतकरी आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रांतून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नुकतेच 17 डिसेंबर रोजी राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले होते.

त्याच धर्तीवर हे आंदोलन सुरू ठेवून मुस्लिम समाज संघटनांना सोबत घेऊन आंदोलनकारी शेतकर्‍यांना समर्थन दर्शविण्यासाठी शाहीन बागच्या शैलीत एकदिवसीय ‘किसान बाग’ आंदोलन चंद्रपुर येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरु होते. धर्मांध जातीयवादी शक्तींनी देशातील शेकडो मुसलमानांचा छळ करत माॅबलिंचींग सारखे अत्याचार केले, हजारो दलितांचे शोषन सुरु आहे. परंतु वर्तमान व्यवस्थेने देशातील लाखो शेतकऱ्यांचा इतका छळ केला की, त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले. याला आम्ही शासन पुरुस्कृत हत्या समजतो.

या वरुन देशात शेतकरी हा सर्वात अत्याचार पिडीत आहे व सर्व पिडित-शोषीत घटकांनी एकत्रीत येऊन शेतक-यांच्या आंदोलनाला बळ देण्याची गरज आहे, सिएए एनआरसी विरोधी आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने सत्ता व अधिकारांचा दुरुपयोग करत दिल्लीतील शाहीन बाग चळवळीला चिरडण्याच प्रयत्न करत होते. त्यावेळी पंजाबच्या निरनिराळ्या भागातील शेतकऱ्यांनी शाहीन बागेत येऊन लंगर व आंदोलकांच्या समर्थनाचे औदार्य दाखवले होते आणि आत्ता पंजाबमधील शेतकर्‍यांशी एकरुपता व सहानुभूती दाखवत मुस्लिमसमाजाने आपापल्या शहरांमध्ये किसान बाग आंदोलन सुरु केलेले आहे. या देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आरएसएससारख्या संघटनेला सत्तेपासून दूर ठेवणे ही काळाची गरज असून त्यासाठी सर्व उत्पीडित लोकांमध्ये ऐक्य असणे आवश्यक आहे. चंद्रपुर येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर किसान बाग चे आंदोलन करण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव कुशलभाऊ मेश्राम, विदर्भ समन्वयक राजुभाऊ झोड़े, मो.पुजल वहीद खान, ऍड. फरहात बेग, मुंतज़िर खान, अड़.जावेद शेख, शेख अखबर, इस्माइल शेख, बशीर शेख, नाहिद काझी मैडम, मुस्लिम संघर्ष समितीचे अब्दुल अजीज, डॉ. सिराज खान, सलाउद्दीन काझी, सय्यद इफ़्तेख़ार अली, डॉ.विवेक बोरिकर,जिल्हाध्यक्ष प्रवीण गावतुरे, जिल्हा महसचिव जयदीप खोब्रागडे, धीरज बाम्बोडे, शहर अध्यक्ष बंडू भाऊ ठेंगरे, रामजी जुनघरे, महिला जिल्हाध्यक्षा कविताताई गौरकर, शहर अध्यक्षा तनूजाताई रायपुरे, नितिन रामटेके, मधुभाऊ वानखेड़े, सुभाष ढोलने, सुभाष थोरात, रूपचंद निमगड़े, सतीश खोब्रागडे, अक्षय लोहकरे, मिलिंद दुर्गे, सोनल वालके आदि पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here