सिमेंट कंपनीतील कामगारांना केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या किमान वेतन प्रमाणे वेतन देण्यात यावे!
प्रहार जनशक्ती पक्ष व जय भवानी कामगार संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातुन केली मागणी

अमोल राऊत । राजुरा
आज दिनांक १४/१०/२०२० रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रहार जनशक्ती पक्ष व जय भवानी कामगार संघटने कडून निवेदन देण्यात आले.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपुर येथील कामगारांना केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या किमान वेतन प्रमाणे वेतन देण्यात यावे तथा २५०० कामगारांच्या स्वाक्षरीसह विविध मागण्या देण्यात आल्या.
गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या भ्रष्टाचाराशी चौकशी तात्काळ करावी व त्यांना निलंबित करावे कथा नांदा फाटा पोलीस चौकी चे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील या दोघांचेही मोबाइल क्रमांकाची इन्कमिंग औटगोईंग नंबरची चौकशी करून त्यांच्याशी असलेले माफीचे संबंध उघडकीस येत असल्याने त्यांच्यावर देखील निलंबनाची कार्यवाही करावी.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व उद्योगांमध्ये कोळसा खाणींमध्ये उदाहरणार्थ जी एन आर महालक्ष्मी मी या ठिकाणी स्थानिक बेरोजगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे.
राजुरा कोरपणा जिवती गोंडपिंपरी या सर्व तालुक्यातील सर्वच रस्ते खराब असून तात्काळ त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे.
या सर्व मागण्या दिनांक ३०/१०/२०२० पर्यंत पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आज जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर या ठिकाणी मिळाले आहे आता समोर यावर खरोखर उपाय योजना करण्यात येणार की नाही हे बघायचे आहे अन्यथा दिनांक ३०/१०/२०२० रोजी नांदा फाटा येथे आमरण उपोषण मी आपल्या सहकाऱ्यांसह सुरू करील. असा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी महेशभाऊ हजारे, कुक्कु सोनानी, नितीन रा कुमरे, मुकेश मेहता, निखिल बजाइत, अजवान ताक, नितेश बेरड, समीर देवघरे, श्री. सुनील ढवस् हे सर्व उपस्थित होते.