हाथरस येथील अत्याचार ग्रस्त दलित तरुणीच्या कुटुंबियांना न्याय द्या

0
401

हाथरस येथील अत्याचार ग्रस्त दलित तरुणीच्या कुटुंबियांना न्याय द्या

खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची राज्यपालांकडे हाक

राजु झाडे

चंद्रपूर : हाथरस मधील दलित समाजातील तरुणीवरील अत्याचार दडपण्यास धडपड करणाऱ्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अत्याचारी आरोपीना कठोर शिक्षा होणे व पीडितेच्या कुटुंबांस न्याय मिळणे अत्यंत गरजेचे आहे. हाथरस येथील अत्याचार ग्रस्त दलित तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी विनंती खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिह कोश्यारी याची भेट घेऊन केला. यावेळी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंडे उपस्थित होते.
उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर अत्यंत अमानुषपणे सामूहिक अत्याचार करून हत्या करण्यात आली व प्रकरण दडपण्यासाठी पुरावे नष्ट करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने रात्रीच्या काळोखात अंत्यसस्कार देखील घाईने उरकले. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या गावी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या चौकशी ने पीडित कुटुंबीय व अन्य कोणाचेही समाधान झाले नसून उच्चं स्तरीय चौकशी गरजेची असून राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपतीना विशेष विनंती करून हस्तक्षेप करावा व पीडितेच्या कुरुंबियास न्याय द्यावा अशी मागणी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here