काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार मा. नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात चंद्रपूरात केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निदर्शने

0
471

काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार मा. नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात चंद्रपूरात केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निदर्शने

 

 

 

पंकज रामटेके/विशेष प्रतिनिधी

केंद्रातील भाजपा सरकारने राजकीय द्वेषातून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी व काँग्रेसचे नेते श्री राहुलजी गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड या वर्तमान पत्राच्या समूह प्रकरणी राजकीय द्वेषातून ईडीची नोटीस पाठवून चौकशीच्या माध्यमातून त्रास देत असल्याबद्दल तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुख्यालयात घुसून दिल्ली पोलीसानी काँग्रेसच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना बळजबरीने मारहाण केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते माजी खासदार मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात विदर्भ किसान मजूदर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांच्या पुतळ्यासमोर केलेल्या निषेध धरणे आंदोलनात
आज दिनांक १७ जुन २०२२ रोजी भारतरत्न राष्ट्रमात प्रियदर्शिनी श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला काँग्रेसचे युवानेते श्री राहुल पुगलिया यांच्या हस्ते मालापूर्ण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली व काँग्रेसच्या पदाधिकारी व कामगार नेत्यांनी केंद्र सरकारच दडपशाहीचा विरोधात निषेध नोंदविला. यावेळी श्री नरेशबाबू पुगलिया म्हणाले की, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी या वर्तमान पत्राच्या समूहाबाबत केस सुरू असतांना काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व श्री राहूल गांधी यांना ईडी, इन्कम टॅक्स व अन्य केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून भाजपा प्रणित केंद्र सरकारने मुद्दाम त्यांना त्रास देण्याचे व बदनाम करण्याचे सत्र सुरू केले हे उघड आहे.

 

तसेच मुस्लीम समाजाचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर साहेब संबंधी नुपुर शर्मा यांनी आक्षेपार्ह विधान केले, हे सुध्दा धर्मा-धर्मा मध्ये व जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करण्याची भावना आहे. “अग्नीपथ” च्या माध्यमातून १० लाख बेरोजगारांना नोकरी देण्याची केंद्रातील भाजपा सरकारची घोषणा म्हणजे युवकांना फसविण्याचीच योजना आहे. त्या नोक-या नसून एकप्रकारचे निश्चित कालावधीचे प्रशिक्षणच आहे. ४ वर्षानंतर त्यांचा जिवनात अंधकार दिसत असल्यामुळे ते आज रस्त्यावर संघर्ष करीत आहे. असे आपल्या भाषणात सागितले
यानंतर विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री देवेंद्र बेले, जिल्हा महामंत्री श्री अशोक नागापूरे, चंद्रपूर जिल्हा इंटकचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर पोडे, कामगार नेते श्री देवेंद्र गहलोत, कॉग्रेसचे नेते अँड. विजय मोगरे यांनी उपजिल्हाधिकारी चंद्रपूर यांना श्री नरेशबाबू पुगलिया यांनी पत्राद्वारे महामहीम राष्ट्रपतीना उपजिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत निवेदन सादर केले.

 

याप्रसंगी सर्वश्री विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे ग्रामिण अध्यक्ष श्री गजाननराव गावंडे (गुरुजी), जिल्हापरीषदेचे माजी सदस्य अविनाश जाधव, शिवचंद्र काळे, रामभाऊ टोंगे, कामगार नेते वसंत मांढरे, साईनाथ बुधे, बल्लारपूर शहर अध्यक्ष नासिर खान, तारासिंग कल्सी, विरेंद्र आर्या, रामदास वागदरकर, वी.सी. बॅनर्जी, अनिल तुंगीडवार, युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष स्वप्नील तिवारी, श्रीमती रत्नमालाताई बावणे, सौ. राधाबाई आत्राम,विनोद पिंपळशेंडे, अजय महाडोळे, रतन तिलावार, सुधाकरसिंह गौर, बाबूलाल करुणाकर, बापू अंसारी, बी.के. मून व शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here