माझी वसुंधरा या अभियान अंतर्गत राजूरा नगरीत निघाली लक्षवेधक रैली ! अनेकांचा सहभाग !

0
559

माझी वसुंधरा या अभियान अंतर्गत राजूरा नगरीत निघाली लक्षवेधक रैली ! अनेकांचा सहभाग !

🛑🟩🟡💠चंद्रपुर 🟣💠🟡किरण घाटे💠🟡 महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि.14 आँक्टाेंबर 20 ते 31 मार्च 2021पावेताे पृथ्वी, जल, वायु ,आकाश, अग्नि या पंचतत्वावर पर्यावरण विषयक मानवी स्वाभावातिल बदलासाठी जनजागृति व शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यांत येत आहे .
🟡💠🛑🟢🟣 वाहनां द्वारे होणारे वायु प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम ,जनजागृति शिक्षण व प्रसार,या बाबत माहिती देण्या करिता आज शनिवार दि.16 जानेवारी 2021 ला सकाळी 10.30 वाजता राजूरा नगरीत सायकल रैलीचे (मुख्य मार्गाने )आयोजन करण्यात आले होते. 💠🟡🟢🛑या कार्यक्रमाची सुरुवात नगर परिषद प्रांगणातील पथनाट्याने झाली
💠🟡🟢🛑स्थानिक व्यापारी लाँइन, नाका न.3 सोमेश्वर मंदिर, माता मंदीर रोड , आसिफाबद रोड, पंचायत समिति, मार्गावरुन (रैली) फिरुन नगर परिषद प्रांगणात या लक्षवेधक सायकल रैलीची सांगता झाली .
💠🟢🟣🟡सदरहु रेैलीत राजू-यातील विविध सामाजिक संघटना, शालेय विद्यार्थी, युवा आणि महिलांनी आपला सहभाग नाेंदविला हाेता.
🟡💠🟣🟢पतंजली योग महिला समितीच्या तालुका प्रभारी, नेफडोच्या तालुका सचिव ,सखी मंच सदस्या,नामवंत सहज सुचल महिला व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका एँड. मेघा धोटे, अंजलि गुंडावार, सहज सुचल व्यासपीठाच्या सदस्या कृतिका सोंनटक्के, बोलमवार,अनुष्का गुंडावार, बादल बेले, अवनी गुंडावार, संतोष देरकर, लांडे, नगर परिषद कर्मचारी, पथनाट्य पथक , आणि नागरिक माेठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या रैलीने आज राजूराकरांचे लक्ष वेधुन घेतले हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here