विजय कॉलनीतील रोहित्र स्थलांतरण प्रक्रियेला गती

0
411

विजय कॉलनीतील रोहित्र स्थलांतरण प्रक्रियेला गती

आ. सुलभाताई खोडके यांनी केले स्थानिक समस्येचे निराकरण

प्रतिनिधी/सदानंद आ खंडारे

अमरावती 13 जानेवारी : नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासह विविध वसाहतीमध्ये नागरी सुविधांची पूर्तता करण्याकरिता आमदार सुलभाताई खोडके यांच्या वतीने गतिमान विकास कार्यक्रम राबविला जात आहे. अशातच प्रभाग क्रमांक 3 नवसारी स्थित कठोरा रोड येथील रंगोली लॉन समोरील हाऊसिंग सोसायटीच्या विजय जिल्हा कौन्सिल्स एम्प्लॉईज को-ऑप हाऊसिंग सोसायटीच्या 100 के.व्ही.ए.डी.टी.सी. बदली करण्याच्या कामाचा आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ करण्यात आला. विजय कॉलनी परिसरातील रस्त्यामधील डी.पी. स्थलांतरित करण्याची स्थानिकांची मागणी तथा महावितरण प्रशासनाची गरज लक्षात घेता आमदार महोदययांच्या वतीने या बाबीला प्राधान्य देण्यात आले. जेणेकरून आगामी काळात रस्ता रुंदीकरण करण्याला घेऊन सुविधा व्हावी. याकरिता ही बाब उपयुक्त ठरणार आहे या शब्दांमध्ये आमदार सुलभाताई खोडके द्वारे यावेळी नागरिकांशी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी रोहित्राची स्थलांतरण प्रक्रिया करण्यापूर्वी आमदार महोदयांच्या हस्ते यावेळी कुदळ मारीत औपचारिकता साधण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक प्रशांत डवरे, नगरसेविका मंजुश्री महल्ले, नीलिमा काळे, प्रशांत महल्ले, वर्षा कुर्हेकर, विजय शिक्षक कॉलनी येथील अध्यक्ष आबासाहेब पाथरे, सचिव दिलीप बोके, अनिल देशमुख, दीपक गुडधे,गजानन देशमुख, कावडकर, देशमुख साहेब, प्रमिला पाथरे, सविता राऊत, कुमुदिनी देशमुख आदींसह नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासह विजय कॉलनी येथील रस्त्यामधील डीपी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया प्रारंभ झाल्याबद्दल तद्नंतर उपलब्ध होणाऱ्या सुविधेला घेऊन स्थानिकांच्या वतीने आमदार महोदयांच्या प्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली कार्यक्रमांअंती सर्व उपस्थितांचे नगरसेवक प्रशांत डवरे, मंजुश्री महल्ले ,निलिमा काळे यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here