३६सफाई कामगारांना मनपाने केले कामावरुन कमी ! कामगारांनी घेतली आ.जाेरगेवारांची भेट !
🟨🛑🟡🟩💠चंद्रपूर🟡💠🛑किरण घाटे💠🛑नुकताच चंद्रपूरातील घंटागाडी कामगारांचा संप मिटला .त्या नंतर लगेच स्थानिक मनपाने कार्यरत ३६सफाई कामगारांना कुठलीही पूर्व सुचना न देता कामावरुन केले असल्याचे खात्री लायक व्रूत्त आहे .🟪🟧🛑💠🟩🔶🟥🟣या बाबत हाती आलेल्या माहिती नुसार असे कळते की काेराेना महासंकटात ३६कामगारांना महानगर पालिका व्दारे वन अकादमी काेविड-१९(सिसिसि)पाँझिटीव्ह इमारत मध्ये सफाई कामगार म्हणुन कामावर घेतले .स्वताच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी दि.२३मार्च २०२०पासून इमाने इकबारे कामे केली .🟪🛑🟡🟩🟧🟥🟣🌀🔶परंतु आता त्या सर्व (३६)कामगारांना एकाएकी कामावरुन कमी केल्यामुळे त्यांच्या कुंटुबाचा उदारनिर्वांचा प्रश्न निर्माण झाला आहे .या सर्व कामगारांनी आज शुक्रवार दि .१२फेब्रुवारीला सकाळी ११वाजता चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशाेर जाेरगेवार यांची जनसंपर्क कार्यलयात जावून भेंट घेतली. त्यांना आपबिती सांगितली. व एक निवेदन सादर केले .
