चिमूर क्रांतीभूमीत आता मिळणार २४ तास पाणी पुरवठा

0
497

चिमूर क्रांतीभूमीत आता मिळणार २४ तास पाणी पुरवठा

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नाला आले यश

शासनाने दिले ५८ कोटी रुपयाच्या योजनेस काम सुरू करण्याचे निर्देश

चिमूर

चिमूर क्रांती नगरीत नगर परिषद ची निर्मिती करीत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी चिमूर नप अंतर्गत बिकट पाणी समस्या दूर करण्यासाठी चिमूरकराना ५८ कोटींची २४ तास पाणी पुरवठा नपच्या माध्यमातून देण्याचा शब्द दिला होता . परंतु मध्यतरी नप मध्ये सत्ताबदल झाल्याने न्यायप्रविष्ट लढाई आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी जिंकत पाणी पुरवठा योजनेची निविदा काढीत बांधकाम सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी सदर काम सुरू करण्याचे निर्देश दिल्याने आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नाला यश आलेले आहे नगर विकास विभागाचे सहसचिव यांनी संबंधित यंत्रणेला काम सुरू करण्याचे पत्र दिले आहे यामुळे आता लवकरच २४ पाणी पुरवठा मिळणार आहे.

चिमूर नगर परिषद मध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाभियान मधून ५१.५० कोटी च्या योजनेस तत्कालीन शासनाने मंजुरी दिली होती . दरम्यान चिमूर पाणी पुरवठा २४/७ योजनेची निविदा व कंत्राटदार सुध्दा निश्चित करण्यात आले .परंतु नगर परिषद मधील विरोधकांनी न्यायालयात धाव घेऊन पाणी पुरवठा योजनेस स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले असता अखेर त्यात ही आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी प्रकिया पूर्ण करीत संघर्ष करून शासन दरबारी सतत पत्रव्यवहार करीत प्रयत्न केले
शासनाने सुद्धा मंजूर कामे स्थिगिती केली त्यामुळे पाणी पुरवठा योजना सुरू करण्यास विलंब होत होता तरीही अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र पाठपुरावा करीत असताना त्यांनी पाणी पुरवठा काम सुरू करण्याचे आदेश दिल्याने अखेर नगर विकास विभाग सहसचिव पां. जो. जाधव यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर व मुख्याधिकारी नप चिमूर यांना कार्यादेश तात्काळ देऊन प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहे

चिमूर शहरात विशेष म्हणजे पेठ मोहला परिसरात कित्येक वर्षा पासून नळाद्वारे पाणी मिळत नसल्याने त्या परिसरातील नागरिक दुचाकीवरून पाणी आणत होते अनेक वर्षे त्रास सहन करीत होते. तसेच इतर प्रभागात नळ पुरवठा लपंडाव होत असल्याने नागरिक त्रास घेत आहे .या गंभीर समस्या सोडवण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी चिमुरकर जनतेला २४ तास पाणी पुरवठा चा शब्द दिला होता. तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सतत पत्रव्यवहार करीत दिलेला शब्द पूर्ण केला आहे .या २४/७ या पाणी पुरवठा योजनेमुळे पाणी मुबलक मिळणार असून इतर प्रभागात सुद्धा पाण्याची समस्या राहणार नाही .

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी चिमूर शहरात २४ तास पाणी पुरवठा योजनेच्या कामास तात्काळ काम सुरू करण्याचे निर्देश मिळवून दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करीत अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here