विजय फाऊँडेशनच्या वतीने पाेलिस अधिका-यांचा व कर्मचा-यांचा झाला चंद्रपूरात सत्कार ! अनेकांनी केले त्यांचे कार्याचे काैतुक !

0
535

विजय फाऊँडेशनच्या वतीने पाेलिस अधिका-यांचा व कर्मचा-यांचा झाला चंद्रपूरात सत्कार ! अनेकांनी केले त्यांचे कार्याचे काैतुक !

किरण घाटे

चंद्रपूर:- एकीकडे दीपावलीचा सण चंद्रपूरकर उत्साहात व आनंदात साजरा करीत असतांना विजय फाऊंडेशनच्या वतीने शहरातील स्थानिक पोलिस दलातील वाहतूक शाखेत कार्यरत असणां-या काही अधिकाऱ्यांचा व कर्मचा-यांचा सत्कार नुकताच करण्यांत आला .रात्रंदिवस आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडणां-या या अधिकारी व कर्मचारी वर्गात प्रामुख्याने संदीप बुरडकर , ज्याेति कांबळे , अरुण भटवळकर संजय मांढरे , गजानन शेंडे , वेदप्रकाश धाेटे , गुलाब पाेयाम , संदीप वझे या शिवाय अन्य पाेलिस अधिकारी व कर्मचारी वर्गांचा यात समावेश हाेता .दरम्यान याच कार्यक्रमात भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यांत आली .

सध्यातरी चंद्रपूर जिल्ह्यातील काही पोलीस अधिका-यांचे व कर्मचा-यांचे कार्य उल्लेखनिय व काैतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया या कार्यक्रम निमित्ताने उपस्थितीतांनी या वेळी व्यक्त केल्या तर पाेलिस हे ख-या अर्थाने जनतेचे रक्षक असल्याच्या भावना काहीनी आपल्या बाेलण्यातुन व्यक्त केल्या .विजय फाऊँडनेशनच्या वतीने आयाेजित या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे शहर प्रमुख तसेच उपराेक्त फाऊंडेशन चे विद्यमान अध्यक्ष अजय लहानुजी दुर्गे,भीमशक्तीचे उपाध्यक्ष आणि अल्पसंख्याक समाजाचे अध्यक्ष मझहर बेग ,कुणाला उराडे , स्वप्नील तेलसे यंग चांदा ब्रिगेड चे सदस्य पवन वाकडे , लकी पिंपळे,संदेश भाले, पंकज धोटे ,महिला पदाधिकारी रचना धोटे समीक्षा आसेकर ,प्रगती चुणारकर ,स्वाती मेश्राम इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here