महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र वितरित कार्यक्रमाचे आयोजन
घुग्घूस : अभिदीप केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड चंद्रपुर व पहेल मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लहुजीनगर, खुटाळा, दाताळा नागाळा व चिंचाळा येथील महिलांना स्वावलंबी बनवण्याकरिता व व्यवसाय करून कुटुंबाला आर्थिक मदत होण्याकरिता बचत गटातील महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात आले. याच अनुषंगाने चिंचाळा येथे महिलांना एक महिनाचे ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण,5 पाच दिवसीय एलईडी बल्ब प्रशिक्षण व एक महिन्याचे ॲडव्हान्स शिवणकाम प्रशिक्षण देण्यात आले होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून एकूण 60 महिलांना एकत्रित आणून विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम सांस्कृतिक सभागृह चिंचाळा येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अलीम खान सर (सी एस आर हेड), सौ.सारिका कडू (ब्युटी पार्लर प्रशिक्षक) ,सौ.किरण धोंगडे (शिवणकाम प्रशिक्षक) तर अध्यक्षस्थानी रोशन रामटेके(उपसरपंच खुटाळा), संजय धोंगडे – ज्ञानज्योती इन्स्टिट्यूट चंद्रपूर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. सौ. दीप्ती बांदुरकर यांनी केले तर प्रास्ताविक शितल नागपुरे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. प्रियंका सावसाकडे यांनी मानले , विशेष सहकार्य सौ. लक्ष्मी कवरासे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पहेल मल्टीपर्पज सोसायटीच्या सदस्यांनी सहकार्य केले. 60 महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.