कामगार व स्थानिक तरुणांच्या शोषणास आजी माजी लोकप्रतिनिधी जबाबदार – सुरज ठाकरे

19

कामगार व स्थानिक तरुणांच्या शोषणास आजी माजी लोकप्रतिनिधी जबाबदार – सुरज ठाकरे

नांदा फाटा, तालुका कोरपणा येथे अल्ट्राटेक सिमेंट विरोधात प्रकल्पग्रस्त १३ गावांच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी आधी साखळी उपोषण व त्या नंतर आता आमरण उपोषणास सुरवात केली आहे. या उपोषण स्थळी श्री. सुरज ठाकरे यांनी भेट देऊन आम आदमी पक्ष व जय भवानी कामगार संघटने तर्फे जाहीर पाठिंबा देत उपस्थित गावकरी व कामगारांना मार्गदर्शन केले.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नेहमीच स्थानिक बेरोजगारांसोबत अन्याय होत असल्याचे सुरज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. सिमेंट कंपन्यांमध्ये प्रस्थापित युनियनने कधीही स्थानिक बेरोजगारांना सामावून घेतले नाही असा आरोप सुरज ठाकरे यांनी केला. अनेक वर्षांपासून परप्रांतीयांच्या होत असलेल्या नियुक्तीवर प्रस्थापित युनियन ने अर्थपूर्ण दुर्लक्ष केले.

आजी माजी आमदारांनी देखील या कडे स्वहितार्थ लक्ष दिले नसल्याचा आरोप सुरज ठाकरे यांनी केला.

कंपनीचा फंड हा प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासाकरिता वापरणे हे बंधनकारक असताना देखील कंपनीने सदर फंड हा परराज्यामध्ये वापरला व आमदारांच्या वैयक्तिक कार्यक्रमानकरीता दिल्याचा गंभीर आरोप सुरज ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

प्रस्थापित युनियन कंपनी प्रशासन व आजी-माजी आमदार तथा काही स्थानिक नेते हे संगणमत करून सामान्य जनतेची,बेरोजगारांची, कामगारांची व गावकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राजुरा विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व एकदा हाती द्या या सर्व कंपन्याना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले आहे.

उपोषणकर्त्यांच्या मागण्या या योग्य असून त्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास गंभीर परिणाम प्रशासनाला व कंपनीला भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला.

सी एस आर फंड चा संपूर्ण निधी ह्या प्रकल्पग्रस्त तेरा ही गावांकरता वापरण्यात यावा.

स्थानिक बेरोजगार तरुणांना कंपनीमध्ये तात्काळ सामावून घेण्यात यावे.

गावांमधून कंपनी द्वारे होत असणारी लाईनस्टोन ची वाहतूक ही बंद करण्यात यावी.

कंपनीमधील सर्व कंत्राटी कामगारांना केंद्र शासनाच्या जीआर प्रमाणे पेमेंट देण्यात यावे तसेच दिवाळीचा बोनस हा वाढवून देण्यात यावा.

इत्यादी मागण्यांना घेऊन हे आंदोलन नांदा फाटा अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वाराच्या समोर सुरू आहे.

advt