तोहोगाव येथे गरजुंना ब्लांकेटचे वाटप

0
751

तोहोगाव येथे गरजुंना ब्लांकेटचे वाटप

 

राज जुनघरे
कोठारी (बल्लारपूर): आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम तोहोगाव मुस्लिम समाजाकडून आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विठोबा जेऊरकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उज्वला ठेंगणे माजी सरपंच तथा सदस्य ग्रामपंचायत तोहोगाव, पौणिमा बाबुराव भोयर सदस्य ग्रामपंचायत तोहोगाव,काँग्रेस कार्यकर्ते तथा माजी शाळा व्यवस्था समिती सभापती निलखंठ रागीट, काँग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते भाऊजी टेकाम, पंढरी कुत्तरमारे, रिटायर RFO देवानंद वानखेडे, रिटायर उचश्रेणी मुख्याध्यापक वानखेडे, रिटायर मुख्याध्यापक जानकीराम सूर उपस्तीत होते. सर्व प्रथम विठोबा जेऊरकर यांचे हस्ते केक कापून प्रतिमेला केक भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला.प्रास्ताविक भाषण फिरोज पठाण सदस्य संजय गांधी निराधार समिती गोंडपीपरी यांनी केले.प्रास्ताविक भाषण मद्य मा.सुभाष धोटे यांच्या योगदानाबद्दल थोड्क्यात माहिती दिली. तोहोगावतील 80 टक्के रस्ते काक्रेट झाल्याचे सांगण्यात आले.कार्यक्रमात उपस्थित निराधार,अपंग,विधवा ना मुस्लिम समाजा कडून ब्लॅंकेट व उपस्तीत महिलांना ब्लाऊज पिस चे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्तीत होते . सर्वांना अल्पोहार देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शेख चांद, शेख निसार, कादिर काजी, शेख इरफान,शेख समीर,शेख हब्बू, अरबाज पठाण, शेख अमान,मिलिंद नारनवरे, संतोष रागीट, मधुकर शेंडे, अरविंद खमानकर,धनराज गोहणे, सुरेश वाघडे यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here