अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार

0
278

अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार

चिमूर-वरोरा राष्टीय महामार्गावरील घटना

खडसंगी गावाजवळ आढलुन आला मृतदेह

तालुका प्रतिनिधी
चिमूर.

तालुक्यातील खडसंगी गावाच्या परिसरात बुधवारी दुपारी.३.०० वा. च्या सुमारास अस्वल मृत अवस्थेत आढळून आले असून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चिमूर अंतर्गत येणाऱ्या खडसंगी क्षेत्रात खडसंगी गावापासून १ कि.मी. अंतरावर चिमूर- वरोरा राष्टीय महामार्गाच्या काही अंतरावर बुधवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास काही नागरिकांना अस्वल मृत अवस्थेत असल्याचे आढळून आले. याची माहिती वनविभागाला नागरिकांनी कळविली. काही वेळातच क्षेत्र सहायक यु.डी. धुघरे वनकर्मचाऱ्याच्या ताफ्यासह घटणास्थळवर दाखल झाले. मृत अस्वलाची पाहणी करून सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला.
मृत अस्वलाचे वय सुमारे दोन वर्षे असून वाहणाच्या धडकेने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवित अंतिम अवहालसाठी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती खडसंगी क्षेत्राचे क्षेत्रसहायक यु. डी. घुघरे यांनी इम्पॅक्ट न्यूज २४ शी बोलताना दिली. या वेळी क्षेत्रसहायक इ.एल. नन्नावरे,वनरक्षक कु.आर.के.ढोके, मनोज उरडोड, विनोद औचार, वनमजुर रमेश नागोसे,वसंत मिसार उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here