घुग्घूस शहरातील स्वच्छते करीता कचरा गाड्या (घंटा गाडी) वाढवा
काँग्रेसची नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी
घुग्घूस : शहरातील लोकसंख्या ही जवळपास पन्नास हजाराच्या जवळपास आहेत शहरात अकरा प्रभाग आहेत
नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या घरातील केरकचरा उचलून नेण्यासाठी घरोघरी कचरा गाडी ( घंटा गाडी ) येत असतात मात्र नगरपरिषदेत केवळ पाच घंटा गाड्या असल्यामुळे शहरातील अनेक वॉर्डात आठ – आठ दिवस गाड्याच येत नसल्याने परिसरात कचरा जमा होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्यामुळे यागंभीर प्रकरणाची दखल घेत काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, जिल्हा सचिव अजय उपाध्ये,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, अनिरुद्ध आवळे,इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,रोहित डाकूर, एन. एस. यु. आय. अध्यक्ष आकाश चिलका नुरूल सिद्दीकी, बालकिशन कुळसंगे, दिपक पेंदोर,सुनील पाटील, कुमार रुद्रारप,दिपक कांबळे, कपिल गोगला, अरविंद चहांदे,शहशाह शेख, आयुश आवळे, अंकुश सपाटे,साहिल आवळे, रंजित राखुंडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.