लाॅयड्स ग्राम काॅलनीत समृद्धी गटाचे कावड यात्रा
दरवर्षी प्रमाणे रविवार दि.२५ ऑगस्ट २०२४ रोजी शिवजलाभिषेकासाठी कावड यात्रा काढण्यात आली होती,सर्व काॅलनीतील नागरिक शिवभक्तांना यात्रेत आले की व आपल्या परिवारासह सहभागी झाले.
भगवान भोलेनाथांना जलाभिषेक करुन पुण्य मिळेल व वढा गावातील तीन नदीच्या संगमावर जावुन लाॅयड्स ग्राम काॅलनीतील बालाजी मंदिरात सायंकाळी जलाभिषेक पुजा व आरती करण्यात आली,प्रसाद व अल्पोहार व्यवस्था करण्यात आली.सर्व भक्ताने व परिसरातील नागरिकाने प्रसाद,अल्पोहाराच्या लाभ घेतला.
समृद्धी गटाचे वरीष्ठ पदाधिकारी बोलण्यात आले की,शिवभक्तांच्या आवडत्या सावन महिण्याची सर्वात जास्त वाट पाहत असतात हे जाणून घेतले पाहिजे.हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे.या ऋतूत निसर्गही खूप आनंदी असतो.आषाढाच्या कडक उन्हातनंतर पावसाचे थेंब जेव्हा पृथ्वीला भिजवतात तेव्हा तिला नवचैतन्य प्राप्त होते.आजूबाजूला हिरवळ दिसत असून उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
याप्रसंगी लाॅयड्स ग्राम काॅलनीतील कावड यात्रेचे पदाधिकारी,सदस्य व सर्व काॅलनीतील नागरिक उपस्थित होते.