खा.बाळा धानाेरकरांच्या मध्यस्थीमुळे जय भवानी कामगार संघटनेचे नांदाफाटा येथील उपाेषण तुर्त स्थगित !
किरण घाटे
राजूरा :- कामगरांच्या विविध मागण्यांसाठी जय भवानी कामगार संघटनेव्दारे येत्या ३०आँक्टाेबरला नांदाफाटा येथे उपोषणाला बसण्याचा इशारा प्रशासनाला देण्यांत आला हाेता.दरम्यान खासदार बाळा धानोरकर यांनी मध्यस्थी केल्यामुळे तूर्तास हे उपाेषण स्थगित करण्यांची माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे युवा नेते सूरज ठाकरे यांनी आज संध्याकाळी या प्रतिनिधीस दिली .नुकत्याच चार दिवसांआधी जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष सुरज ठाकरे तदवतच अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवळपुर येथील कंत्राटी कामगार यांच्या तर्फे प्रतिनिधी म्हणून सुनील ढवस यांनी खासदार बाळा धानोरकर यांना राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध मागण्यांचे निवेदन तथा कामगारांचे होत असलेले शोषणा बाबत सविस्तर माहिती एका लेखी निवेदनातुन दिली होती सदरहु निवेदनात मागण्यांची पुर्तता न झाल्यास उपाेषणास बसण्यांचा इशारा दिला हाेता .
परंतु या निवेदनाची तात्काळ दखल घेत गोरगरिबांचे हिताचे प्रश्न तथा कामगारांच्या रास्त मागण्या लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार बाळा धानोरकर यांनी त्वरीत यावर चर्चेच्या माध्यमांतून तोडगा काढण्याचे शिष्ट मंडळाला आश्वासन दिले व तसे पत्र देखिल चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे सुरज ठाकरे यांनी सांगितले .येत्या ०५/११/२०२० पर्यंत बैठक लावून सदर मागण्या बाबत चर्चा करण्यांचे आश्वासन मिळाले आहे. प्रशासन व कामगार संघटना यांच्या माध्यमातून चर्चेद्वारे या मागण्यां साेडविण्यांचे प्रयत्न हाेणार असुन तसे जय भवानी कामगार संघटनेला या बाबतीत लेखी आश्वासन देण्यांत आले आहे .