आँल इंडिया पँथर सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी सिध्दार्थ शेंडे ,

0
507

आँल इंडिया पँथर सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी सिध्दार्थ शेंडे ,

जिल्हा महासचिव पदी आशिष बाेरेवार तर जिल्हा सचिव पदी राजश्री झाडेची नियुक्ती !

किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी :-आँल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक दादा केदार य़ांचे एका आदेशान्वये विदर्भ अध्यक्ष आशिष वानखेडे तदवतचं कार्याध्यक्ष दादा ढाेले यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी सिध्दार्थ शेंडे यांची उपरोक्त पँथर सेनेसाठी अध्यक्ष म्हणून, जिल्हा महासचिव म्हणुन आशिष बाेरेवार तर जिल्हा सचिव म्हणून राजश्रीताई राजेश झाडे यांची नुकतीच नियुक्ती केली आहे .विदर्भ हा आँल इंडिया पँथर सेनेचा बालेकिल्ला असुन भविष्यात या संघटनेत महिला माेठ्या संख्येने सहभागी हाेणार असल्याचे मत आज सिध्दार्थ शेंडे यांनी इम्पँक्ट२४च्या चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधीशी बाेलतांना व्यक्त केले

आँलइंडिया पँथर सेना अत्याचाराच्या विराेधात सातत्याने लढा देण्यांचे कार्य करीत असल्याची प्रतिक्रिया राजश्रीताई झाडे यांनी या नियुक्ती नंतर बाेलतांना दिली दरम्यान सिध्दार्थ शेंडे , आशिष बाेरेवार तथा राजश्री झाडे यांचे नियुक्तीचे स्वागत विनोद भाेळे , चेतन इंगळे , राजूभाऊ सराेदे ,अजय भालेराव ,संघपाल तायडे आदिंनी एका पत्रकातुन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here