अखिल भारतीय माळी महासंघाचा प्रतिभा धानोरकर यांना जाहिर समर्थन

0
35
अखिल भारतीय माळी महासंघाचा प्रतिभा धानोरकर यांना जाहिर समर्थन
चंद्रपूर : संपूर्ण देशात लोकसभेची निवडणूक होत आहे. केंद्रात मागील दहा वर्षात भाजप गटबंधन सरकार होते.शिक्षण, रोजगार,आरोग्य व शेतीमालाला योग्य हमीभाव अशा मूलभूत प्रश्नाला या सरकारने बगल दिली. या दहा वर्षात लोकशाही मूल्य पायदळी तुडविली जात आहेत. अघोषित हुकूमशाही सुरू आहे. त्यामुळे लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी संविधान वाचविण्यासाठी केंद्रात सत्ता परिवर्तन होणे गरजेचे आहे. सत्ता परिवर्तनासाठी आम्ही आपल्या सोबत उभे आहोत,त्यामुळे आपल्याला जाहीर समर्थन देत आहोत,असे पत्र अखिल भारतीय माळी महासंघाने प्रतिभा धानोरकर यांना पाठविले आहे. आम्ही तुम्हाला समर्थन देत आहोत असे पत्रात म्हटले आहे.
माळी समाज हा ओबीसी प्रवर्गात येत असून ओबीसी ची जातनिहाय – जनगणना करणेची मागणी अनेक वर्षांपासून केल्या जात आहे. केंद्रातील सरकारने ओबीसी समाजाच्या न्यायिक मागण्या कडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. केंद्रात, राज्यात विकासाच्या नावावर फक्त जुमलेबाजी सुरू आहे. राज्य सरकार जिह्वा परिषदेच्या हजारो शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे जिल्ह्यात एकही मोठा उ‌द्योग आला नाही. बेरोजगारांची फौज निर्माण होत आहे. युवक नोकरदार, महिला व शेतकरी तसेच सर्व स्तरांतून सरकार विरुद्ध जनतेन प्रचंड रोष दिसून येत आहे.
अशा परिस्थितीत लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी अखिल भारतीय माळी महासंघ जि. चंदपूर यांनी लोकसभा क्षेत्रातील समस्त माळी समाजाने बैठक घेऊन इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना जाहीर समर्थन देण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय माळी महासंघ जि. चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. सचिन भेदे, महिला आघाडी अध्यक्ष छायाताई सोनुले, संगीता पेटकुले, अॅड प्रशांत सोनुले, पांडुरंग कोकोडे, शंकर मांदाडे, रामदास ठाकरे सुरेन्द्र मांदाडे, सद्‌गुरू ढोले, श्रीकांत शेंडे, राकेश मोहूरले, रोहित निकुरे, शुभम कावळे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here