अंगणवाडी केंद्रातील बालकांना गणवेश वाटप

0
574

अंगणवाडी केंद्रातील बालकांना गणवेश वाटप

चामोर्शी (भेंडाळा) ✍️सुखसागर झाडे गडचिरोली

ग्रामपंचायत भेंडाळा अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मुलांना गणवेश वितरण करण्यात आले. कोरोणा महामारीमुळे मागिल वर्षापासून देशव्यापी लाॅकडाऊने अनेकांचा रोजगार हिरावला गेल्याने आर्थीक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची जाणीव करीत फुल नाही तर फुलाची पाकळी या म्हणी प्रमाणे एक हाथ मदतीचा करीत भेंडाळा ग्रामपंचायतच्या संरपंचा कुंदाताई नरेंद्र जुवारे तथा सदस्य निखिल उंदिरवाडे यांनी दखल घेत अंगणवाडी केंद्रातील बालकांना स्व:खर्चातून गणवेश वाटप करून बालकांना शिक्षणाची ओळ लागावी या हेतुने प्रोत्साहित केले. अंगणवाडी हे संस्कारुपी केंद्र असून बालकांना विविध प्रकारचे ज्ञान देण्याचे बालकांचा पाया मजबूत करणारा महत्वपूर्ण कणा आहे असे प्रतिपादन यावेळी सरपंच सौ. कुंदाताई नरेंद्र जुवारे यांनी केले. याप्रसंगी सदस्य निखिल उंदीरवाडे, व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here