राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघाच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी अमाेल राऊत यांची नियुक्ती !

0
91

राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघाच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी अमाेल राऊत यांची नियुक्ती !

 

राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघाची नुकतीच विदर्भ विभागीय अध्यक्ष किरण माेरे यांनी विदर्भ उपाध्यक्ष म्हनुन प्रणित भगत यांची नियुक्ती करत चंद्रपुर जिल्ह्याची कार्यकारणी घाेषित केली.

जिल्हा प्रभारी म्हणून विनाेद दुर्गे, जिल्हाध्यक्ष अमाेल राऊत, जिल्हा महासचिव नितीन गाडगे, जिल्हा संपर्क प्रमुख अँड. चैत्यन खरतड, जिल्हा उपाध्यक्ष कपिल भगत, चंद्रपुर तालुकाध्यक्ष सचिन बाेबडे यांची नियुक्ती संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय सुर्यवंशी, राज्यध्यक्ष मा. संताेष जाधव, राज्य संघटक मा. नरेंद्र साेनारकर, राज्य सचिव मा. निलेश ठाकरे यांच्या अनुमतीने करण्यात आली.

राजुरा येथील पत्रकार अमोल राऊत यांनी स्वतःच्या लेखणीतून सामान्य जनतेच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी सातत्याने आग्रही, सामाजिक कार्याची विशेष तळमळ, विविध सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभाग तसेच वर्षातून तालुक्याच्या ठिकाणी दोनदा रक्तदान रक्तदान शिबिर राबवून जीवनदान देण्याचे काम करीत असून भर उन्हाळ्यात पानपोईची ही व्यवस्था करून देण्यातही दरवर्षी पुढाकार घेत आहे.

नवनियुक्त कार्यकारणीचे पत्रकार बांधवांकडून अभिनंदन करण्यात येत असून शुभेच्छांचा वर्षाव हाेत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here