श्रीलंका देशाकडून सुपरिचीत व नामवंत कवयित्री अर्चना सुतारला NWLO-TBC या जागतिक संस्थेव्दारे इंटरनॅशनल महात्मा गांधी आयकॉन अवॉर्ड-2020 पुरस्कार प्रदान!

0
912

 

अनेक पुरस्कार व सन्मानपत्रांच्या मानकरी ठरल्या सुतार!

राज्यांतुन हाेतेयं त्यांचे काैतुक!

किरण घाटे :- समाजातील कोणतीही माणसे म्हणजे जाती-धर्म नसतोच मानवता हा एकच धर्म असतो मग त्यात माणुसकी असली म्हणजे सगळ्याच गोष्टी अशक्य सुद्धा शक्य होऊन जातात.इतरांबद्दल माया, दया, प्रेम अंगी असणे जरुरीचे असते.सत्याच्या वाटेवर चालत असताना अनेक अडचणी खाचखळगे असतात परंतु कोणत्याही गोष्टीला न डगमगता आपण आपले काम निर्मळ आणि निस्वार्थी मनाने केले की फुलांची बरसात झाल्यासारखे! जीवन सफल झाल्यासारखे वाटते. इश्वरावर श्रद्धा ,अंगी ,जिद्द ,मेहनतआणि चिकाटी असेल तर यश संपादन झाल्याशिवाय राहवत नाही. अशाच अनेक विचारांची सोबत असणांऱ्या जगातील माणसे आपला एक परिवार समजून आजपावेताे सुपरिचीत कवयित्री अर्चना दिलीप सुतार यांनी समाजहित योगी कविता करून काेराेना संकटा आरंभी आणि कोरोनाच्या संकटातही सामाजिक बांधिलकी जाेपासत कवितांतून संदेश देण्याचे अमुल्य काम केले आहे. या जगावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले असताना करोना विषयावर सखोल अभ्यास करून त्या पासून बचावासाठी त्याचे वास्तव वर्णन करून अनेक कविता समाज माध्यमांद्वारे समाजापुढे मांडल्या आहेत.याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याने आणि भारतातील प्रत्येक राज्याने त्यांना अनेक सन्मानांनी सन्मानित केले आहे. हा सन्मान गौरवित असताना एक त्यांची पुढची पायरी म्हणूनच देशातच नव्हे तर बाहेरील देशातील श्रीलंकाने (देशाने)त्यांना NWLO-TBC या (जागतिक) संस्थेमार्फत इंटरनॅशनल महात्मा गांधी आयकॉन अवॉर्ड-2020 हा एक महत्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान केला आहे. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करत त्यांच्या या कार्याचे गाेड कौतुक केले आहे.सदरहु आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळताच अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले दरम्यान सहज सुचल समुहाच्या मेघा धाेटे(राजूरा) मायाताई काेसरे( सास्ती)प्रभा अगडे (नागपूर)जास्मिन शेख (चंद्रपूर)कविता चाफले (दुर्गापूर चंद्रपूर)पूनम रामटेके (चंद्रपूर) प्रतीक्षा झाडे व सरीना काेटनाके राजूरा यांनी कु. अर्चना सुतार यांचे कार्याची प्रशंसा करीत एका संयुक्तिक संदेशाव्दारे त्यांचे अभिनंदन केले आहे .विशेष म्हणजे कु. अर्चना सुतार ह्या अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या असुन त्या विद्यार्थांना सुसंस्क्रूत धडे देण्यांचे पवित्र कार्य करते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here