मूल संजय गांधी निराधार याेजनेच्या अध्यक्षपदी संजय मारकवारांची नियुक्ती!
अनेकांनी केला त्यांचेवर अभिनंदनांचा वर्षाव!

चंद्रपूर किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी
स्थानिक पंचायत समिती मूल चे विद्यमान सदस्य भूतपूर्व सभापती, माँ दुर्गा मंदीराचे विश्वस्त उपाध्यक्ष तथा मूल राजगडचे मुळ निवासी संजय मारकवार यांची नुकतीच संजय गांधी निराधार याेजनेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे त्यांचे या नियुक्ती साेबतच मूल तालुक्यातील अर्चना मार्कंडाजी चावरे ,रुपाली संताेषवार व सुनिल शेंडे यांची सदस्य म्हणुन याच याेजनेवर निवड झाली असल्याचे व्रूत्त आहे .विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल ग्रुपच्या अर्चना चावरे व रुपाली संताेषवार ह्या सदस्या आहे . संजय मारकवार यांचे सामाजिक कार्यात नेहमीच उल्लेखनिय व माेलाचे योगदान राहिले असुन मूल तालुक्यातील अनेक कार्यरत सामाजिक संघटनेशी तथा शैक्षणिक संस्थांशी त्यांचे अत्यंत निकटचे संबंध आहे.या पुर्वि सुध्दा त्यांनी अनेक पदे विभूषित केली आहे . मूल मध्येच नव्हे तर अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यात त्यांची एक दिलदार मित्र म्हणुन आेळख आहे .कुठल्याही सामाजिक कार्यात ते नेहमीच आपला सहभाग नाेंदवितात.हे विशेष !त्यांचे या निवडीचे काँग्रेसचे जेष्ठ नेते घनश्याम येनुरकर तथा मूल तालुक्यातील चांदापूर ग्राम पंचायतचे भूतपूर्व सरपंच अशाेक मार्गनवार यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान आज ही निवडीची बातमी कानावर पडताच संजय मारकवार यांचे मित्रमंडळीनी व हितचितकांनी त्यांचेवर अक्षरशा अभिनंदनाचा वर्षाव केला.