कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २५ गोवंशिय जनावरांना जीवनदान

0
114

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २५ गोवंशिय जनावरांना जीवनदान

२७ लक्ष पंचवीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी घेतला ताब्यात

 

राजुरा, १५ मार्च :- राजुरा लक्कडकोट मार्गे हैद्राबाद येथे एका तेलंगणा पासिंग च्या कंटेनर मध्ये कत्तलिकरिता गोवांशिय जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती काल गस्त घालत असताना पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार आरटीओ नाका लक्कडकोट येथे नाकाबंदी करून वाहन अडवून झडती घेतली असता जनावरे आढळून आली. यात एकूण २५ नग बैल किंमत प्रत्येकी २५ हजार रुपये प्रमाणे सहा लक्ष पंचवीस हजार रुपये व भारत बेंझ कंपनीचे कंटेनर (टिएस १२ युडी ५३२१) किंमत अंदाजे २१ लक्ष रुपये असा एकूण २७ लक्ष २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

वाहन चालक सय्यद फारुख सय्यद युसुफ (३८) रा. महमूद नगर किशनबाग बहादुरपुरा हैद्राबाद (तेलंगणा), शेख जलील मोहमद शेख (३८) रां. इलियासनगर ता. नारनुर जि. आदिलाबाद (तेलंगणा), कबीर जैनुद्दिन शेख (२५) रा. गुडसेला ता. जिवती जि. चंद्रपूर असे तीन जणांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी सदर जनावरे गडचांदूर येथील रहिवासी अज्जू कुरेशी यांच्या मालकीची असून कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची कबुली दिली. सदर आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, मोटरवाहन अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून अटक करण्यात आली.

सदर ची कार्यवाही चंद्रपूर चे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी राजुरा दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनात सपोनी संतोष वाकडे, पोहवा सुभाष कुळमेथे, नापोअ विजय मुंडे, पोअं राहुल वैद्य, प्रमोद मिलमिले, सचिन थेरे, प्रवीण जुनघरे, चालक पोअं काकासाहेब, सर्व पोलीस स्टेशन विरुर यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here