कोविड-19 टेस्टींगसाठी जादा दर आकारल्यास कारवाई करणार : जिल्हा शल्य चिकित्सक राठोड

0
399

कोविड-19 टेस्टींगसाठी जादा दर आकारल्यास कारवाई करणार : जिल्हा शल्य चिकित्सक राठोड

27 शासकीय सेंटरवर नि:शुल्क तपासणी

17 खाजगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटर

खाजगी सेंटरला अधिकतम रू. 800 दर आकारण्यास परवानगी

चंद्रपूर, दि. 9 डिसेंबर : कोरोना तपासणीकरिता जिल्ह्यातील जे खाजगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटर शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक दर आकारत असल्याचे आढळून आल्यास त्या खाजगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटर चा परवाना रद्द करून त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिल्या आहेत.

आयुवैज्ञानिक संस्था तथा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शन सुचनांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय तथा महानगरपालिका स्तरावर कोविड-19 आजाराची अॅन्टीजन टेस्टींग करीता अॅन्टीजन टेस्टींग सेंटर व आर.टी.पी.सी.आर. टेस्टींग सेंटर असे एकुण 27 ठिकाणी निशुल्क केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. या केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारण्यात येत नाही. तसेच जिल्ह्यात एकुण 17 खाजगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटर कार्यरत असून त्यांचेकरिता शासनाने अॅन्टीजन टेस्टींग शुल्क जास्तीत जास्त रू. 800 ठरवून दिलेला आहे. यापेक्षा जास्त शुल्क कोणत्याही खाजगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटर च्या व्यवसायीकांना आकारता येत नाही. कोणत्याही सेंटर ने रू. 800 पेक्षा जास्त चाचणी शुल्क आकारल्यास या बाबतची माहिती तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालय कोरोना नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र . 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी.

खाजगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटरच्या इन्फ्लुएन्झा (ताप) सद्रुष लक्षणे असल्यास व अॅन्टीजन टेस्ट निगेटीव्ह आल्यास त्यांचे नमुने हे आर.टी.पी.सी.आर. करीता पाठविणे आनिवार्य असल्यामुळे खाजगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटर असे नमुने शासकीय व्ही.डी.आर.एल. लॅब, शासकीय वैद्यकीय महाविद्यलाय, चंद्रपूर येथे पाठवितात.  या नमुन्यांकरीता शासनातर्फे कोणत्याही प्रकारचे सेवाशुल्क आकारण्यात येत नाही. तथापि काही खाजगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटर हे आर.टी.पी.सी.आर. टेस्ट करीतादेखील परस्पर अॅन्टीजन टेस्टींग चे सेवाशुल्क रू. 800 घेतल्यावर सुध्दा अतिरीक्त सेवाशुल्क आकारत आहे व ही बाब अत्यंत खेदाची आहे. अशा प्रकारच्या घटना नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हा सामान्य रूग्णालय कोरोना नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र . 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधून तत्कार नोंदवावी.

सद्या जिल्ह्यात संस्था डॉ. अतुल चिद्दरवार पॅथेलॉजी लॅब व डॉ. संगई पॅथेलॉजी लॅब या दोन खाजगी संस्थेना आर.टी.पी.सी.आर. स्वॉब कलेक्शन सेंटर साठी जिल्हा स्तरावरून परवानगी देण्यात आलेली आहे व अशा संस्थेला सुध्दा रू. 1800 पेक्षा जास्त सेवा शुल्क आकारता येत असल्याचे डॉ. राठोड यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here