चामोर्शी नगर पंचायतीला लागले निववडणूकीचे वेध

0
379

चामोर्शी नगर पंचायतीला लागले निववडणूकीचे वेध

मोर्चे बांधणी सुरू: तिसऱ्या आघाडी कडे सर्वांचे लक्ष

सुखसागर झाडे (तालुका प्रतिनिधी चामोर्शी)

चामोर्शी नगर पंचायत निवडणूकीकरीता प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले होते. दिवाळी गिफ्ट वाटप प्रक्रिया जोमात सुरू असतानाच नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणूक लागल्याने सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते त्या निवडणूकीसाठी जोमाने भिडले. आपापल्या प्रभागात पदवीधर निवडणूकीचा प्रचार करतानाच स्वतः च्या ही उमेदवारीचा सुतोवाच करीत होते. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनंतर नगर पंचायतीची प्रचार मोहीम व राजकीय डावपेच आखण्यास सुरवात झाली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे चामोर्शी नगर पंचायतीत देखील तोच प्रयोग यशस्वी होईल, या आशेवर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे नेते डोळे👀लावून बसले आहेत. परंतु कांग्रेस पदाधिकारी महाविकास आघाडीच्या गठबंधनाच्या मूडमध्ये दिसत नाही. त्यामुळे सन्मानजनक तोडगा न निघाल्यास शिवसेना स्वबळाची तयारी करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दोन ते तीन जागांवर तडजोड करण्याच्या मूडमध्ये आहे. भाजपनेही सर्व प्रभागावर लक्ष केंद्रित करून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आमदार साहेबांचे होमग्राउंड असल्याने त्यांचे याकडे विशेष लक्ष असणार आहे. कांग्रेसमध्ये तगडे उमेदवार असल्याने ते गटागटाचे राजकारण करून स्वतच्या अखत्यारीत अधिकाधिक जागा खेचून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. आरक्षणामुळे अनेक प्रस्थापित नगरसेवकांची भंबेरी उडाली असून ते इतर प्रभागावर लक्ष केंद्रित करून आहेत. एकूण १७ प्रभागापैकी प्रभाग क्र. २,७,९,१४व१६ हे पाच प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहेत. त्यातील प्रभाग क्र. २ व ९ मध्ये जातीय राजकारण चालण्याची चिन्हे पाहता, इतरांसाठी प्रभाग क्र. ७,१५व १६ हे तिनच प्रभाग फक्त शिल्लक आहेत. त्या जागांवर अनेक जण दावे ठोकत आहेत. कांग्रेस मध्ये १५ व १६ प्रभागामध्ये सत्ता संघर्ष होत असल्याने काहिनी माघार घेण्याकरिता आपल्या पत्नीसाठी महिला राखीव असलेल्या प्रभाग क्र. ५ व ११वर दावे ठोकण्याची तयारी दर्शविली आहे.
राष्ट्रवादी व शिवसेनेच्या भूमिकेवर महाविकास आघाडीचा निर्णय अवलंबून असेल तर कांग्रेस व भाजपातील बंडाळीवरून तिसऱ्या आघाडीचा जन्म अवलंबून आहे. संभाव्य निवडणुकीची राजकीय पक्षांची व्युहरचना कशीही असली तरी कांग्रेस, भाजपातील तगडे उमेदवार व काही प्रमाणात अपक्ष उमेदवार आपापल्या प्रभागात आतापासूनच प्रतिस्पर्ध्यासमोर तगडे आव्हान उभे करण्यात यशस्वी झालेले दिसतात. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व राजकीय पक्ष व त्यांचे नेते कसा राजकीय सारिपाठ तयार करतात, याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here