पतंजली याेग समितीचे शरद व्यास व संजीव व्यास यांनी घेतली मायाताई काेसरे यांची भेट !

0
852

पतंजली याेग समितीचे शरद व्यास व संजीव व्यास यांनी घेतली मायाताई काेसरे यांची भेट !

चंद्रपूर 🟡🛑किरण घाटे🛑🟡मूल तालुक्यातील जानाळा येथील प्रगतीशिल महिला कास्तकार मायाताई काेसरे गेल्या काही दिवसां पासुन आपल्या शेताच्या कामात व्यस्त असल्याने त्या (पतंजली समिती बाबत ) ट्विटर, फेसबुक व योगा कडे मुळीच वेळ व लक्ष देवु शकल्या नाही. त्यामुळे पतंजली योग समीती चंद्रपूर येथील य़ाेग समितीचे पदाधिकारी शरद व्यास (जिल्हा संघटन मंत्री चंद्रपूर) तसेच संजीवजी व्यास (जिल्हा युवा प्रभारी चंद्रपूर )यांनी मायाताई कोसरे यांचे मुळ गांव असलेल्या जानाळ्याला धावती भेट दिली .या वेळी योग विषयी चर्चा करण्यांत आली. एव्हढेच नाही तर त्यांचे शेतातील काही काम करणां-या मजुरांना शरद व्यास व संजीव व्यास यांनी वेळात वेळ काढुन योगाचे महत्त्व समजावून दिले मजुरांनी त्यांना विविध रोगा बद्दल माहिती विचारली असता त्यांनी अतिशय साेप्या भाषेत त्यांना माहिती देवून त्यांचे वेळीच समाधान केले .जणू काय शेतशिवारात याेग प्रशिक्षण कार्यशाळाच सुरु आहे की काय असा भास काही वेळ हाेवू लागला हाेता. पतंजली संघटनेचे कार्य खरोखरचं उल्लेखनिय कौतुकास्पद आहे असे म्हटल्यास ते अतिशाेक्तिचे ठरणार नाही .🔶🔷🟪भेटी दरम्यान शेतशिवारातच त्यांचा वनभाेजनाचा कार्यक्रम झाला. स्वामीजींची विशेष कृपा व आशिर्वादा या मुळे हे सर्व पवित्र कार्य घडत असते असे मायाताई काेसरे या वेळी म्हणाल्या ! 🟨🌀🟢शेतात काम करीत असलेल्या मजुरांनी व मायाताईनी शरद व्यास व संजीव व्यास यांनी भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले .🟡🛑🔵🟣याेग वर्ग, आत्मा , व परमात्मा यांचे संगम स्थळ आहे तेथे निश्चितच आपणांस सुख ,शांती आत्मविश्वास व चांगले आराेग्य मिळते अशी भावना मायाताई काेसरे यांनी आपल्या बाेलण्यातुन या वेळी व्यक्त केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here