दिलीप पाटील यांच्या गझलसंग्रहाचे उद्या प्रकाशन

0
112

दिलीप पाटील यांच्या गझलसंग्रहाचे उद्या प्रकाशन

 

राजुरा :- राजुरा येथील प्रसिद्ध गझलकार दिलीप पाटील यांच्या “मी शब्दांना मशाल करतो” या दुसऱ्या गझलसंग्रहाचे प्रकाशन दिनांक ०८ मार्च २०२४ ला सायंकाळी पाच वाजता मृणालगिरी सेलिब्रेशन सभागृह चंद्रपूर येथे प्रसिद्ध विचारवंत मा. नरेन गेडाम यांचे हस्ते संपन्न होत आहे. आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी चंद्रपूर तर्फे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डॉ इसादास भडके असून जागतिक किर्तीचे कवी मा. लोकनाथ यशवंत यांचे प्रमुख उपस्थितीत आंबेडकरवादी गझलेचे अभ्यासक तसेच प्रसिद्ध गझलकार मा. प्रमोद वाळके ‘युगंधर’, नागपूर व अमरावतीचे ख्यातनाम गझलकार तथा आकाशवाणी निवेदक मा. संजय घरडे हे गझलसंग्रहावर अभ्यासपूर्ण भाष्य करणार आहेत.
प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले असून विद्रोही गझलकार मा. रमेश बुरबुरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या मुशायऱ्यात मा. अतुलकुमार ढोणे यवतमाळ, मा. गुलाब मेश्राम धामनगाव रेल्वे, मा. रोशन गजभिये अमरावती, मा. गिरीश खोबरागडे यवतमाळ, मा. अर्जुमन बानो शेख बल्लारपूर, मा. डॉ अर्चना जुनघरे राजुरा, मा. शितल कर्णेवार देवाडा, मा. गायत्री शेंडे राजुरा, मा. प्रशांत भंडारे आमडी इत्यादी नामवंत गझलकार आपल्या रचना सादर करणार आहेत. प्रसिद्ध निवेदक शुद्धोधन मेश्राम व विरेनकुमार खोब्रागडे यांचे बहारदार सुत्रसंचालन हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य राहणार आहे.
करिता रसिकांनी कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आंबेडकरी साहित्य प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here