महावितरण विभागातर्फे विद्युत दूतांचा गौरव व जनजागृती रॅली

0
98

महावितरण विभागातर्फे विद्युत दूतांचा गौरव व जनजागृती रॅली

दिनांक ०४ मार्च २०२४ रोजी महावितरण क्षेत्रातील प्रकाश दूत यांचा गौरव करण्याचा सत्कार कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आहे. त्यानिमित्याने राजुरा तालुक्यात महावितरण उपविभाग कार्यालय येथे कार्यरत असलेले संपूर्ण तंत्रज्ञ यांना पुष्पगुच्छ देऊन “लाईनमन दिवस” साजरा करण्यात आला. तसेच जनतेत विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याकरिता महावितरण उपविभाग कार्यालय येथून बाईक रँली काढून विद्युत सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपकार्यकारी अभियंता श्रीनिवास बंडूगु, प्रमुख अतिथी सहाय्यक अभियंता अमित ठमके, सहाय्यक अभियंता गोपालसिंग राणा, सहाय्यक अभियंता सौ- सुवर्णा जुगादे, कनिष्ठ अभियंता कुणाल आंबुलकर व संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here