एमआयडीसी परिसरातील वाघाचा बंदोबस्त करा

0
341

 

चिमूर औधौगिक संघटना ने
दिले वन परिक्षेत्र अधिकारी ला निवेदन

चिमूर.

चिमूर येथील एमआयडीसी परिसरात पट्टेदार वाघ असल्याने कारखानदार, शेतकरी व कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून त्या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी चिमूर औद्योगिक संघटनेने केली असून वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर यांना निवेदन देण्यात आले
दहा ते बारा दिवसापासून एमआयडीसी आजुबाजूच्या परिसर व शेतात, असेच
लागून असलेल्या नाल्यामध्ये पट्टेदार वाघ फिरत असून तो दहा बारा दिवसापासून रात्र.
दिवस दडून बसलेला आहे एमआयडीसी च्या खाली असलेल्या परिसरात पॉवर प्लॉट
असलेल्या परिसरात या पट्टेदार वाघाने दोन रानटी डूकर सुध्दा मारले आहे.
दिवसासुद्धा त्या एमआयडीसी आजूबाजूच्या परिसरात फिरत असतो. वाघ दिवसा सुद्धा फिरत असल्याने अनेकांनी बघितले आहे
एमआयडीसी परिसरामध्ये शेतकऱ्यांना व उद्योजकांना तसेच कर्मचा-यांना या पट्टेदार
वाघाची दहशत निर्माण झाली आहे. एमआयडीसी
परिसरात असलेल्या कारखान्यामध्ये ग्राहक सुद्धा येण्यास घाबरत आहे. दि. 26 जून ला लक्ष्मण गायधनी व विकास शेंदरे शेतात काम करणाऱ्या मजुरांनी वाघ बघितले असल्याचे सांगत
शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतकरी व मजूर सुद्धा कामाला येण्याकरिता फार मोठया प्रमाणात
घाबरत आहे एमआयडीसी उदयोजक ,शेतकरी, नागरिकांत वाघाची दहशत निर्माण झाली आहे. वाघास पिंजऱ्यात बंद करून बंदोबस्त करण्याची मागणी कर चिमूर औद्योगिक संघटनेचे

अनिल मेहेर ,नरेंद्र राजूरकर , लक्ष्मण गायधनी

बद्रीनाथ देसाई गोपाल बावनकर पुरुषोत्तम गायधनी बाळकृष्ण बोबाटे लक्ष्मण पांडुरंग गायधनी विकास शेंदरे श्रीहरी दडमल आदी नी केली असून वन परिक्षेत्राधिकारी यांना निवेदन देण्यात आले ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here