महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागवंश युथ फोर्स राजुराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0
250

महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागवंश युथ फोर्स राजुराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

 

राजुरा : सामाजिक कार्यात नेहमी हिरीरीने भाग घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासणारा सामाजिक कार्यकर्ता अमोल राऊत यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा विश्वभूषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रक्तानुबंध जोपासत समाजाला खरी आदरांजली अर्पण करण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

अमोल राऊत व त्यांचे सर्व सहकारी नागवंश युथ फोर्स राजुरा हे वर्षातून दोनदा रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरीब, गरजूंना नेहमी रक्ताची मदत मोठ्या सेवा भावाने करतात. 6 डिसेंबरला परमपूज्य, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.

तरी सर्व रक्तदात्यांनी बुद्धभूमी बसस्थानक समोर राजुरा येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागवंश युथ फोर्स राजुराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त संख्येने रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन मुख्य संयोजक अमोल राऊत यांनी केले आहे.

“रक्ताला नसते कोणती जात पात
एक तेच तर आहे जे करते सर्व धर्मावर मात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here