मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपुर तर्फे बल्लारपुर तालुक्यात जागतीक महिला दिन साजरा
मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपूर, च्या माध्यमातून 12 ते 16 वयोगटातील विद्यार्त्यांसाठी खेळाच्या माध्यमातून, शिक्षण, जीवन कौशल्य, विकास कार्यक्रम स्केल (SCALE) कार्यक्रमा अंतर्गत बल्लारपुर तालुक्यातील 2554 विद्यार्थ्यांसोबत खेळातून विकास शिक्षण, जीवन कौशल्य हा कार्यक्रमा अंतर्गत आज दिनांक 8 मार्च 2021 ला जागतिक महिला दिन मॅजिक बस च्या वतीने विविध शाळेमध्ये व गावांमध्ये साजरा करण्यात आला.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले त्यात शाळेतील मुलांनी आपल्या आई साठी स्वतः तयार केलेले ग्रीटिंग कार्ड बनवून आई व ताई ला शिक्षक, सरपंच, ग्राम सदष्य, आशावर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस अश्या विविध पदावर असलेल्या व कोरोना योध्याना हे ग्रीटिंग कार्ड भेट दिली असे एकूण बल्लारपूर तालुक्यातील 2000 मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला याच सोबत महिलांच्या हळदी कुंकू, पाक कला स्पर्धा, महिला सभा अश्या विविध उपक्रमांनी हा दिवस मॅजिक बस चे प्रत्येक गावातील समुदाय संघटक यांनी साजरा केला व या दिवसाचे महत्व सर्वाना पटवून दिले.
हा कार्यक्रम मॅजिक बस चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे तर तालुका समन्वयक मा. नितेश मालेकर सर यांच्या निदर्शनात पार पाडण्यात आला तर या दिवसाचे निमित्ताने शाळेतील विद्यार्थी, गावातील महिला, ग्रामपंचायत शिक्षकवृंद आशा अंगणवाडी सेविका अश्या विविध घटकांनी महिला दिनाच्या निम्मितांनी सक्रिय सहभाग घेतला व मॅजिक बस चे प्रत्येक गावातील समुदाय संघटक यांच्या सहकार्याने हा जागतिक महिला दिवस प्रत्येक गावात साजरा करण्यात आला.