देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात १४ ठिकाणी रक्तदान शिबीर

0
370

देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात १४ ठिकाणी रक्तदान शिबीर

अनेक सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन

चंद्रपूरचे माजी जि.प. अध्यक्ष तथा राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता गांधी चौक घुग्घुस येथे “रक्तदान करूया, प्रेमाचे नाते जोडूया” हे ब्रीद वाक्य घेऊन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री. देवरावदादा भोंगळे मित्र परिवार घुग्घुसतर्फे मागील १९ वर्षांपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सुपर मार्केट सभागृह राजुरा, आशीर्वाद मंगल कार्यालय जुना वणी नाका वरोरा, लोकमान्य विद्यालय भद्रावती, बंगाली कॅम्प समाज मंदिर चंद्रपूर, इंदिरा नगर रेल्वे पटरी जवळ चंद्रपूर, गांधी पुतडा परिसर बिबी, श्रीकृष्ण सभागृह कोरपना, ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र जिवती, गुरुदेव मंदिर चंदनखेडा, माता कन्यका परमेश्वरी सभागृह गोंडपिपरी, प्रा. आ. केंद्र तोहोगाव, ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा, भाजपा जनसंपर्क कार्यालय विरूर (स्टेशन) या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी २७५९ रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले होते तसेच देवराव भोंगळे मित्रपरिवाराला रक्तदान गौरव सन्मान पुरस्कार तत्कालीन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व अन्न, औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या देण्यात आला होता.

रक्तदान करून देशसेवा करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक श्री. देवरावदादा भोंगळे मित्र परिवार घुग्घुसतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here