श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषीदूत विद्यार्थ्यांनी सादर केले कीटकनाशक हाताळणेवर प्रात्यक्षिक

0
370

श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषीदूत विद्यार्थ्यांनी सादर केले कीटकनाशक हाताळणेवर प्रात्यक्षिक

Impact 24 news
प्रतिनिधी देवेंद्र भोंडे

अमरावती/ [वडगाव माहोरे ] :- यावर्षीपासून कृषी विद्यापीठात पदवी शिक्षण घेत असलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना अंतर्गत आठ आठवडे ग्रामीण भागात शेतकऱ्यांसोबत कार्य करावयाचे आहे.
त्यानुसार श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्न श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय अमरावती येथील
विद्यार्थी कु.देवयानी अनिल उपरिकर हीने श्री.स्वप्नील सुधाकरराव पाटिल राहणार वडगांव(माहोरे) जिल्हा अमरावती या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तसेच त्यांच्या सोबत इतर शेतकऱ्यांना,
कीटकनाशक द्रावण कसे तयार करायचे त्याची योग्य मात्रा कशी घ्यावयाची त्याचे प्रात्याक्षिक करून दाखवले .त्याच प्रमाणे कीटकनाशके हाताळताना त्यांची काळजी कशी घ्यावी, फवारणी कशी करावी याचे प्रात्याक्षिक करून दाखविले. एखादेवेळी विषबाधा झाल्यास कुठले प्रथमोपचार करावे, दवाखान्यात जाऊन उपचार सुरू करेपर्यंत काय काळजी घ्यायची याबाबत माहिती दिली..
हा संपूर्ण कार्यक्रम श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशांक देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यक्रम प्रभारी कु. मीरा ठोके, कृषी कीटक शास्त्र विभागाच्या सौ. कल्पना पाटील यांच्या मार्गदर्शनात राबवित आहेत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here