भगवान महावीर जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत
भगवान महावीर जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे जटपुरा गेट येथे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शीतपेयाचे ची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, कल्पना शिंदे, वैशाली मद्दीवार, विमल कातकर, वंदना हजारे, कविता निखारे, मुन्ना जोगी, विश्वजीत शाहा, बादल हजारे, प्रभाकर खारीकर, विजय मद्दीवार आदींची उपस्थिती होती.
संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आणि जगू द्या असा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त जैन समाज बांधवांच्या वतीने शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी जटपुरा गेट येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेच्या स्वागताची व्यवस्था करण्यात आली होती. सदर शोभायात्रा शहराच्या मुख्यमार्गाने होत जटपुरा गेट येथे पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.