लाॅइट्स ग्राम काॅलनीत शिवजयंती उत्साहात साजरी

0
487

लाॅइट्स ग्राम काॅलनीत शिवजयंती उत्साहात साजरी


घुग्घुस येथुन काही अंतरावर म्हतारदेवी गाव परिसरातील लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योग यांचे लाइट्स ग्राम काॅलनीत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला माल्यार्पण करून सामुहिक अभिवादन करण्यात आले. तसेच ‘जय भवानी,जय शिवाजी’ चा जयघोष करण्यात आले.

दर महिण्यात लाॅइट्स कुटुंब एकत्र येतात व लहान मुलांना अल्पाहार व लकीड्रा मध्ये लागलेले वस्तु वरिष्ठ मान्यवराच्या हाताने भेट देण्यात आले.

समाजातील जातिभेद दुर करुन सर्वांनी एकत्रित येऊन सर्वच महापुरुषांच्या विचारांचे मंथन करावे आणि असेच कार्यक्रम आयोजित करावे असे कार्यक्रमाचे वरिष्ठ राधेश्याम गांधी यांनी मार्गदर्शनात आव्हान केले. समृध्दी अध्यक्ष श्री.व सौ. श्रीकांत परांजपे,मंगेश,प्रतिभा सिंह यांनी आभार मानले.

यावेळी सौ. नम्रता पांडे,सौ.अंजू गुप्ता, सोनल भास्कर,मनोज बाविस्कर,महेश तिवारी व काॅलनी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here