पाणी पूरवठा योजनेतील प्रस्तावीत कामे जलद गतीने पूर्ण करा – आ. किशोर जोरगेवार

0
494

पाणी पूरवठा योजनेतील प्रस्तावीत कामे जलद गतीने पूर्ण करा – आ. किशोर जोरगेवार


अधिका-यांशी बैठक, कामांचा आढावा जाणून घेतला !

🟣🔴🟠🟢चंद्रपूर🟠🟤🟢किरण घाटे 🔴🟠🟤
चंद्रपूर शहर आणि ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी अनेक कामे प्रस्तावीत आहे. या कामात पारदर्शकता ठेवा. अनेक कामे प्रगतीपथावर असली तरी ती संथ गतीने सुरु आहे. त्यामूळे या कामात येत असलेल्या अडचणी तात्काळ सोडवून ही सर्व कामे जलद गतीने करत वेळेत पूर्ण करावीत अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्यात.
🔴🟠काल शुक्रवारी शासकीय विश्राम गृह येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी महाराष्ट्र जिवन प्राधिकरण व ग्रामीण पाणी पूरवठा विभागाच्या अधिका-यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी सदर सुचना केल्यात. या बैठकीला ग्रामीण पाणी पूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळसागडे, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता घोडमारे यांच्यासह सबंधित विभागाच्या अधिका-यांची उपस्थिती होती.
🟤🟢 मागील अनेक वर्षात पाणी प्रश्न सोडविण्याच्या दिशेने अपेक्षीत असे काम झालेले नाही. परिणामी चंद्रपूर शहर आणि ग्रामीण भागात दरवर्षी पाणी टंचाई जाणवते. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागातही अनेक कामे प्रस्तावीत करण्यात आले आहे. यातील काही कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र हे सर्व कामे वेळेत पूर्ण होणार या दिशेने नियोजन करावे असे निर्देश यावेळी आमदार जोरगेवार यांनी सबंधित विभागाला दिलेत. 🔴🟢महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाअंतर्गत येत असलेल्या प्रस्तावीत कामाची सध्या स्थितीबाबतची माहिती यावेळी आ. जोरगेवार यांनी अधिका-यांकडून जाणून घेतली. खनिज निधी अंतर्गत तिर्थक्षेत्र वढा येथे वाढीव पाणी पूरवठा योजनेचे अंदाजपत्रक सादर करण्यात यावे, नवीन चंद्रपूर येथे जलशुध्दिकरण केंद्र ते साई मंदिर पर्यतच्या पिण्याच्या पाण्याची पाईप लाईनचे काम लवकर करण्यात यावे, अमृत योजनेचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे, वढा व पांढरकवडा या गावांना शूध्द पाणी पूरवठा करण्यासंदर्भात उपाय योजना करण्यात याव्यात. असे निर्देश यावेळी त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला दिले, तसेच यावेळी त्यांनी प्रामीण पाणीपूरवठा योजने अंतर्गत २०२०-२१ मध्ये प्रस्तावीत कामांबाबत माहिती जाणून घेतली. चंद्रपूर मतदार संघातील प्रगतीपथावर असलेल्या कामाच्या सध्या स्थितीबाबतही यावेळी आ. जोरगेवार यांनी अधिका-यांकडून सविस्तर माहिती घेत महत्वाच्या सुचना केल्यात. या बैठकीला मनपा गटनेते डाँ. सुरेश महाकुलकर, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, प्रा. सुर्यकांत खनके, अजय जयस्वाल, आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here