डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण

0
356

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण

नेचर फाउंडेशन चा उपक्रम

चिमूर/तालुका प्रतिनिधी
नेचर फाउंडेशन नागपूर द्वारा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संविधान दिनाचे निमित्ताने चिमूर तालुक्यातील ३७ शाळा, विद्यालय व महाविद्यालयात घेण्यात आली होती या स्पर्धेत ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत तीन गट होते शालेय गट, माध्यमिक गट व महाविद्यालयीन गट या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अमर ठवरे, उद्घाटक म्हणून ऍड. राहुल वासनिक उच्च न्यायालय नागपूर, प्रमुख अतिथी म्हणून कुमरे उपप्राचार्य रा तू महाविद्यालय चिमूर, मुख्यध्यापक सुकारे, श्रेयस लाखे, बंटी वनकर, यश बनकर आशिष गजभिये, अमोल कावरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पल्लवी दोडके हिने केले तर प्रास्ताविक निलेश नन्नावरे यांनी केले.

महाविद्यालयीन गटामध्ये प्रथम क्रमांक आकाश घोडमारे RTM महाविद्यालय चिमूर, द्वितीय क्रमांक स्नेहा मेश्राम (भिवाजी वरभे विद्यालय बोथली), तृतीय क्रमांक मनीष चौधरी (राजीव गांधी महा. शंकरपुर) यांनी पटकाविला तसेच माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक प्रतीक्षा दडमल (विकास विद्यालय, शंकरपूर), व्दितीय क्रमांक रिया पाटील (लोक विद्यालय, मोटेगाव) व तृतीय क्रमांक आदित्य पाटील (सरस्वती कन्या विद्यालय, नेरी) यांनी पटकाविला. तसेच शालेय गटामधे प्रथम क्रमांक वेदांत सोननये (जनता विद्यालय, नेरी), व्दितीय क्रमांक किरण सावसाकडे (लोक विद्यालय, मोटेगाव) व तृतीय क्रमांक प्रिया तरारे (एन. जे. राऊत विद्यालय, अडेगाव) यांनी पटकावले. स्पर्धेत प्रत्येक सहभागी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर दोन बक्षिसे देण्यात आली.

या कार्यक्रमाला यशस्वीपणे पार पाडण्याकरिता नेचर फाउंडेशन चे विद्यार्थी सुप्रिया ढोणे, अस्मिता ढोणे, सोनू गरमळे, गुंजन सावसाकडे, निखिल मोडक, सागर दडमल, अश्विना गजभे, पुनम गजभे यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here